शनिवार, ३ ऑक्टोबर, २००९

फरहत शहजाद


एकटा.. एकटा.. नको विचार करूस..
एकटा एकटा नको विचार करूस..
मरून जाशील मरून जाशील नको विचार करूस..

प्रेम घडी भरच ही खूप आहे..
खोट .. खर .. नको विचार करूस..

ज्याची प्रकृतीच दंशणे हो..
तो तर दंशेल, नको विचार करूस..

उन्हात एकट करून जाते
का ही छाया? नको विचार करूस..

आपलं आपण हरवून तू,
पावले आहे काय? नको विचार करूस..

वाट कठीण आणि उन्हे कडक आहेत
कोण येणार? नको विचार करूस..

स्वप्न, सत्य वा कल्पना
काय आहे जग? नको विचार करूस..

पुसून घे डोळे आणि चालला चल.......
ध्येय.. मार्ग.. नको विचार करूस..

विश्वाचे दु:ख सोबत आहे..तुझ्या
स्वतःला एकटा! नको विचार करूस..

जगणे परत, दुसऱ्यांदा होऊन जाईल..
हे जीवा इतकं नको विचार करूस..

मान माझ्या शहजाद अन्यथा
पस्तावशील, नको विचार करूस..

-फरहत शहजाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...