रविवार, २० फेब्रुवारी, २०११

अतहर नफीस

विचारांत आणि जागता श्वासांचा एक प्रवाह आहे मी
आपल्या हरवलेल्या किनारांकरिता वाहत आहे मी

जळून गेले सारे शरीर अश्या हंगामातील आगीत
एक ऋतू आत्मीय आहे ज्याच्यात आता जिवंत आहे मी

माझ्या ओठांचे स्मितहास्य देऊन गेले संभ्रम तुला
तु मला कुंज प्रिये बघून घे पुष्पांचा मुखवेश आहे मी

बघा माझ्या स्वीकृतीस आता येणार आहे कोण
क्षणभरासाठी 'वेळे'च्या उंबरठ्यावर आलो आहे मी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...