सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

रंग बोलणे करत आणि बोलांस सुगंध येई
वेदना फुलांसारखी दरवळे, जर तू येई

भिजून जात आहेत कुण्या आशांवर डोळे दर सांज
कदाचितशी रात्र हो, रजनीनाथ नदीकिनारी येई

मी तुझ्या स्मृतीशी निसटून चाललो जातो, पण
वाटेत फुलांच्या ताटव्यात सावलींची बटा येई

आजमावत प्रेमाच्या क्षणास चालत आलो, तर जीवा
दुःखाचा उत्सव-सोहळा होई, डोळ्यात अश्रू येई


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...