आबिदा परवीन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आबिदा परवीन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ मे, २०११

होताहोता

जाहल्या हितभर वाटेन-वाटे मनातल्या भावनांच्या.. पडल्या जाणिवांच्या खुणा हृदयाच्या कोपरां-कोपरांत
विचित्र चकमक दिवसभर.. निषिद्ध कलकल रात्रभर..
न हे तुझे दु:ख न ही परिणती कोण्या सुखभर प्रसंगांची., जे दु:खाचे कारण..
कण हे परस्पर मरणाचे आणि अंतहीन विषादाचे शिवशिवतायेत इथे.. स्वप्नभर जगून विरहाचा वणवा पेटवतायेत इथे..

हिस्से झालेल्या भावना जगू न देता कायम मरण्यास ही दुर्लक्षित करतात.
हित विरहित नसलेले हिस्से गोल गोल फिरून जाणीवा धडकवतात गोल हृदयाच्या गाभारात..
गरगर खुपसणारे कुठवर रुतणार त्या लाल गोळ्याला..थडका श्वासांचा सावरतो ठीबकण्यापासून तो लाल गोळा..

कोणास बोलावत होता तो बुडणारा दिवस
आवाज तर आला होता पण कुणी पासंग नव्हता
रात्रभर वेदनेची ज्योत जळत राहे
दु:खाची लव थरथरत राहे रात्रभर..
किसे पुकार रहा था वो डूबता हुआ दिन
 सदा तो आयी थी लेकिन कोई दुहाई न थी

 नसीर
रातभर दर्द की शम्मा जलती रहे
गम की लव थरथराती रहे रातभर..
आपकी याद आती रही..
आपली गाठ सुटण्याकरिता बांधली भराभर..जसा काजवा चमकावा क्षणभर.. 
विलसत होती खूपशी फांदी-फांदीतून पालवी एके दिवशी सळसळ पदभ्रष्ट होण्यासाठी..
लयाचा सुटणार होता बंध संगीतातून आपल्या काही तालदार रचनेपासून..
होता नव्हता सुखनैव प्रसंगाचा भडीमार आपल्या या जालीकेतल्या जगण्यात, केला नाही हिशोब त्या सुखांचा परतून येणाऱ्या दु:खांसाठी.. न हुरळलो सुखास त्या आधी जगलेल्या दु:खभर क्षणांसाठी

कर अवहेलना आयुष्या पुरेपूर .. 
झरणारा वळवाचा पाऊस शोषून न घेता चार महिने विरक्त भटकणारा मान्सूनचा पाऊस हवा धरतीला .. 
मी मला वळवाचा पाऊस राहू दे.. शिणलेले थेंब मिरवत फडकावत बरसेल अन तरसेल हे जीवन माझे इथे.. 
स्वप्नाची हवा राहू दे जीवनात केवळ तो निर्व्याज श्वास घेण्यास मिलनाचा ..
ती पेटेल वणवा शुष्क ठाक झालेल्या या जीवनाच्या जंगलात वियोगाची..केवळ विरहाची.. 
स्वप्नील हवा झुरझुर वारा होईल मग अद्वातद्वा प्रलायाग्नी उभा करायला या जंगलात इथे .. 
होताहोता थांबेल..संपेल हे जीवन माझे श्वास अन पुढचा नसलेला श्वासाच्या अंतरात..
तो एक ठोका चुकलेला असेल..


रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

मौला..
अदभूतच ! उन्मदावस्था या दोन्ही जगात...., स्वच्छंदी हो
या स्वप्नपूर्तीत या श्रीमंतीतच जागृत होउन जा ...
उघडली जेव्हा हृदयाची नयने हे दुखी माणसा
तर ती न पाणावली न धुंद राहिली..
होती नवलाई अशी काही डोळ्यांवर
निष्प्रभ हेच प्रभावरहित राहिले..
पडली निष्प्राण कानांवर दयाळू अजब साद...
की हृदयाचा ठोकाच चुकला....
खबर ही विस्मयकारक प्रेमाची ऐक
ना उन्माद राहिला ना आतुरता राहिली...
ना की तू राहिलास ना की मी राहिलो..
जे राहिले ते निर्भ्रम राहिले..

मला धुंदी तू, भलताच साखरेचा पाक (गोडवा) चाखवलास
कोणत्याच इच्छेची मनात नाही आता, खंत सामावतेय..

ना भय आहे ना संकट आहे, न अभिलाषा (आज्ञा) आहे न विनंती (प्रार्थना) आहे
नाही विचारांचे बंदिस्त हे जग आहे, नाही इच्छा-कामनांनी बरबटलेले हे जग आहे...

न संधीची (परिणामांची) चर्चा आहे, न सवलतीचा (कारणांचा) शोध आहे..
ना की तिथे पाचही जाणीवा पोहोचतात, ना चातुर्याला प्रवेश आहे.. (वाव असतो)

नाही वसणारा आहे इथे नाही वस्ती आहे...न जमीन आहे इथे न संसार आहे...
कंगाल हृदयाने माझ्या तिथे छावणी ही वसवली...

न मिलन आहे न विरह...न उत्कंठा आहे न खेद आहे...
ज्यात असते बेसावध स्वप्न, अशी निज मला ही आली..

- हजरत शाह नियाज

सोमवार, २८ जून, २०१०

चाहूल अशी कोण येई तर वाटते की तू आहेस
सावली कोण पसरे तर वाटते की तू आहेस

जेव्हा फांदी कुणी हात लावावी अशी बागेत
लाजून सावरून जाई तर वाटते की तू आहेस

रस्त्यातल्या धुक्यात कुठल्या वळणावर दूरवर
एक अशी ज्योत चमकून जाई तर वाटते की तू आहेस

संदल हून दरवळत येणाऱ्या उल्हसित हवेचा
प्रवाह कोण स्पर्शे तर वाटते की तू आहेस

ओढून घेऊन चांदण्यांची लखलखत जाणारी चादर
नदी कोण अवखळून झगमगे तर वाटते की तू आहेस

जेव्हा रात्री कोण उशीर किरण माझ्या बरोबर
चुपचाप हून निजून जाई तर
वाटते की तू आहेस

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

रंग बोलणे करत आणि बोलांस सुगंध येई
वेदना फुलांसारखी दरवळे, जर तू येई

भिजून जात आहेत कुण्या आशांवर डोळे दर सांज
कदाचितशी रात्र हो, रजनीनाथ नदीकिनारी येई

मी तुझ्या स्मृतीशी निसटून चाललो जातो, पण
वाटेत फुलांच्या ताटव्यात सावलींची बटा येई

आजमावत प्रेमाच्या क्षणास चालत आलो, तर जीवा
दुःखाचा उत्सव-सोहळा होई, डोळ्यात अश्रू येई


शनिवार, ९ जानेवारी, २०१०

एक बस तू ही नहीं मुझसे खफ़ा हो बैठा

एक फक्त तूच नाही माझ्याशी नाराज होऊन बसला
मी जो दगड कोरला तो देव होऊन बसला

उठून ध्येयच जर आले तर कदाचित काही घटेल
वांच्छित उद्देश तर माझा अपंग होऊन बसला

हितगुज निसटुन गेली बातचीतची करामत परंतु
काही न बोलण ही माझं, माझा आवाज होऊन बसला

उपकृत ए माझ्या मारका ए संजीवका माझ्या
विष-अग्नी जो तू दिला होता तो जल-अमृत होऊन बसला

'शहजाद' च्या जीवाला एकूण-एक सर्व शत्रू मिळवून
वेदना जी उठली की जीव शरीराहून विभक्त होऊन बसला


- फरहत शहजाद


शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २००९

गालिब


सुगंधाची कोण झुळूक असेल तर, श्वासांनी साखळी करू..
इतके स्वप्न डोळ्यां-डोळ्यांत, कोण-कोणाची पूर्ती करू..


ज्याच्या
छायेत मी बसू, तर सगळी दु:ख परकी होत..
पहिले प्रत्येक भिंत पाडत, परत ते घर चिरेबंदी करू..


तू
काही प्रश्नावले होते मला आणि मी आता पर्यंत चिंतीतोय...
किती जखमा लपवून ठेऊ...किती दु:ख अक्षरी करू..


दर
त्या कथेच्या शोकनगरीत आलो आहे तर इच्छितोय.
इच्छितोय
...
प्रथम
संवेदना गालिब आणू, मग एकांतात डोळे  निखळती करू..


सुगंधाची
कोण झुळूक असेल
तर
श्वासांनी  साखळी करू..


-गालिब

बुधवार, ७ ऑक्टोबर, २००९

फैज़


नाही दृष्टीत ध्येय तर जिज्ञासाच बरी
नाही मिलन शक्य तर इच्छा ही बरी...

ना शरीरात रक्त संघटीत न अश्रू नयनात
'नमाजा'ला हौसच अनिवार्य आहे, तर अनुपस्थितीही बरी

कश्याप्रकारे तरी जमवलेल्या सभेत मधुशाले वाले
नाही जे वचन हो मद्यचषकाच, तर बेधुंदीही बरी..

जर प्रतीक्षा कठीण आहे तर जोपर्यंत ए हृदया..
कुणाच्या संकल्पांच्या व्यापांची बातचीतही बरी..

कालप्रवाहाच्या प्रतिद्वंदात परिचित जरी नाही कोणी
तर फ़ैज़ चर्चा स्वदेशची आपल्या सन्मुखही बरी


- फैज़

शनिवार, ३ ऑक्टोबर, २००९

फैज़ अहमद फैज़

जराशा गोष्टीवर तो, जगभरचा आनंद देऊन..
चालला गेला, मला किती विरह देऊन...

चला की इच्छेशिवाय त्याच्या नावावर सर्व करावे
की ज्याने कैद केले आहे, स्वातंत्र देऊन..



पण तिथे तर तसाच शांततेचा (अबोलाचा) पहारा होता..
मी येऊन गेलो तुझ्या घरावरून, बोल देऊन..

विचित्र व्यक्तीचे तर, माझ्याशी गैरसमजच राहिले..
की ज्याला मिळवलं होत मी, संसार देऊन..

हुम्म.. किती साधे समजत होतो, वाचून राहील प्रेषक
कल्पित मित्राला तिखट कटू शब्द देऊन..


- फैज़ अहमद फैज़


गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

मीर हस्सन


प्रेमाच गुपित जर न कळल असतं, या रितीने तू न माझ्याशी लाजला असतास

येऊन तेव्हा बसलास तू, माझ्यापाशी, संकटात जेव्हा मला नाही पकलडल..?
या रितीने तू न माझ्याशी लाजला असतास,
प्रेमाच गुपित जर न कळलं असतं....


आयुष्याने न्याय नाही केला, नाहीतर, मी न्यायाचा तमाशा दाखवला असता
या रितीने तू न माझ्याशी लाजला असतास,
प्रेमाच गुपित जर न कळलं असतं....


सर्व या गोष्टी आहेत, इच्छेच्या(प्रेमाच्याच)! नाहीतर, या रितीने, तू न माझ्यावर वैतागला असता
या रितीने तू न माझ्याशी लाजला असतास,
प्रेमाच गुपित जर न कळलं असतं....


मी नाही ऐकत, कोणाचीच गोष्ट हसन, हृदय हे, गोष्टी ना ऐकवत असता
या रितीने तू न माझ्याशी लाजला असतास,
प्रेमाच गुपित जर न कळलं असतं.... 

- मीर हस्सन

नियाज

मौला..
अदभूतच ! उन्मदावस्था या दोन्ही जगात...., स्वच्छंदी हो
या स्वप्नपूर्तीत या श्रीमंतीतच जागृत होउन जा ...
उघडली जेव्हा हृदयाची नयने हे दुखी माणसा
तर ती न पाणावली न धुंद राहिली..
होती नवलाई अशी काही डोळ्यांवर
निष्प्रभ हेच प्रभावरहित राहिले..
पडली निष्प्राण कानांवर दयाळू अजब साद...
की हृदयाचा ठोकाच चुकला....
खबर ही विस्मयकारक प्रेमाची ऐक
ना उन्माद राहिला ना आतुरता राहिली...
ना की तू राहिलास ना की मी राहिलो..
जे राहिले ते निर्भ्रम राहिले..




मला धुंदी तू, भलताच साखरेचा पाक (गोडवा) चाखवलास
कोणत्याच इच्छेची मनात नाही आता, खंत सामावतेय..

ना भय आहे ना संकट आहे, न अभिलाषा (आज्ञा) आहे न विनंती (प्रार्थना) आहे
नाही विचारांचे बंदिस्त हे जग आहे, नाही इच्छा-कामनांनी बरबटलेले हे जग आहे...

न संधीची (परिणामांची) चर्चा आहे,न सवलतीचा (कारणांचा) शोधआहे..
ना की तिथे पाचही जाणीवापोहोचतात, ना चातुर्य प्रवेशतात(वाव असतो)

नाही वसणारा आहे इथे नाही वस्तीआहे...न जमीन आहे इथे न संसारआहे...
कंगाल हृदयाने माझ्या तिथे छावणीही वसवली...

न मिलन आहे न विरह...न उत्कंठाआहे न खेद आहे...
ज्यात असते बेसावध स्वप्न, अशी निज मला ही आली..

- हजरत शाह नियाज


Related Posts Plugin for WordPress, Blogger...