मानसिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मानसिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १५ जानेवारी, २०१२

गूढ रम्य मालिका


घेऊन मनात असंख्य भ्रम मी खास तयार झालो. माझ्याच मनाची तगमग शांत करण्यास आज मी सज्ज झालो.

परिजन डोळ्यात आणून डोह ओलांडत जावे असे काहीसे वाटते. तुटून एकापरी दुसरे जीवन जगावेसे वाटते. दूर

निष्ठांची एक मालिका तरंगत हेलकावणी देत मला तळमळवत असते. दिव्यांचा अंधार-दरीत सजलेला उपसंहार

पलिकडे मला रिझवणार असतो. शांत जागेस अगदी उभ्या सभेने तीन जगांचे, काळांचे, ऋतूंचे मापं छेदत मी

जात असतो. लिहावेसे काही दूर निष्पाप दूनियेचे मला एक अप्रूप असते. घनीभूत होतात शब्द.......

..................तिथली मालिका शिरते गूढ रम्य देशांत....., जिथे मीच आपला नामशेष झालेला असतो.

मायबोली या संकेत स्थळावर वरिल भाग yachwishay या नावाने मी प्रकाशित केला आहे.

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

गूढ

परस्पर जीवांचे स्वप्न अंतर्धान पडू लागते. फेर सहज विशालकाय होऊ लागतो. मनाला पटेल असे गूढ बनू लागते.

कळीची ताटातूट होऊ नये यासाठी चंद्र किरणे पहाटे गलबत झिरपून ठेवतात; सूर्य किरणास अवधी अजून त्या गलबताभोवती पाणी भरण्यास तर इतक्यात कोणी कळीच्या रोख्याने येत जावे आणि न व्हायची ताटातूट व्हावी.

सखीच्या असंख्य प्रश्नांना कृष्ण हे एक उत्तर असावे. तिलाही न पडणारे असंख्य प्रश्न, त्यांनाही कृष्णमात्र उत्तर असावे.

नदीची तगमग न कधी जाणवणारी आपल्याला, जलमय जीवनात तिचे स्वतःचे अश्रू किती वाहत असतात आणि सोबत तिच्या आयुष्याचा भाग असणारे जल त्यात किती मिसळून जात असते याचा अंदाज कोणाला येत असावा.

या कळी, सखी आणि नदी ची साखळी माझ्या मनात डोकावू लागते आणि गूढ सुटता सुटत नाही....
अर्थ मिळता मिळत नाहीच...

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

दूत


गार गार वारे घेऊन... उशाशी बसून... माझ्यासाठी तीळ तीळ तुटणारा.. मला पाणी डोळ्यात घालून देऊन दूर लोटणारा.. हसरा कधी गूढ कधी.. बस्स हेच दोन वैशिष्ट्य जपणारा.. रडू किती हे सांगणारा.. नको ते आता मान्य करायला, खूप सहन करू' बोलणारा... आठवण काढून काढून मला पिंजणारा... तसाच मनाला झोंबायला लागणारा; खोल कुठे माझ्यात अजूनही सापडणारा... लोटू पाहता तरी दूरपर्यंत मला तो एक दिसणारा..
कधी वाटत त्याच्या वाळवंटात मीच एक वसणारा.. तो गूढ अजून वाळवंट माझ्यासाठी विणत राहणारा.. नाही एक पाण्याचा प्रवाह मी आणणारा' बोलणारा..
'रडू कोसळे कोसळे मला
त्यात पाहिला मी प्रवाह' माझे हेच ते खोटे ठरवणारा, कोण तो... तो दूत कोण?

बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

माहित..

नुसतं नसून असण्यासारखं आहे..

जथ्थे नुसते कारे कारे फुललेले..

व्यथा जिथे तिथे कातळात नुसती कोरलेली...

तिढा कायमचा नुसता मांडलेला..

सलोख्यास क्लेश भासते नुसते गूढ...

गूढ मांडणी नुसती सजलेली.. 

आणि 

नुसतं.. भरून येतं..


पुरे.. ते.. जे माहित करून घेतलेलं..

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

लेणी

आल्हाद, मुराद आणि दयार्द लेणी अजूनही आखलेली बहुदा रेखाटलेली होती. कलाकारांपैकी कौशल आणि कैवल राहण्यासाठी मानलेल्या नात्यांवर विसंबून होती. मनाचा पसारा विस्तृत असल्याने माजलेली संभ्रमावस्था निपटून काढत सौंदर्यस्थळे निर्माण करणे हा मुख्य उद्देश होता. या मनात कोणता ऋतू कधी येईल आणि कधी जाईल हे निश्चित सांगता येत नव्हते. हवामान क्षणोक्षणी अस्थिर आणि बदलणारे होते. कैवल सूर विश्वात रमायचा. त्याचे बंद आडाखे बंदिशीतून दिसून येत. दयार्द लेण्यात तो मंदपणे विहारायचा. तोच कौशल मर्म पूर्ण करण्यात धन्यता मानायचा, मग तो छंद बंधित राहणे असो किंवा लेणी रचणे असो. आल्हाद लेणे विशाल व्यापक आणि या दोन जनांस रुचीपूर्ण होते. मुराद कौशलला रंगमय वाटत असे. 

सोमवार, ४ जुलै, २०११

निमिष

व्यक्तींतली मन स्पंदनांची अनाहूत भाषा कलकलत जाणारी इथे आहे. केशर प्रकाशित उजेड ग्रामी पुरून उरलेला इथे आहे. दरी त्या उभ्या दोन इंद्रधनुंतली, झर्‍या काठच्या गावी इथे आहे. निखळ काचे व्याप्त अदृश्य पाणी इथे आहे. दूर न जाणारी वाट चहूकडे ग्रामाकरिता इथे आहे. अनंत ऋतूंची पखरण क्षणो क्षणी पसरलेली इथे आहे. संवाद खोल मनात चाललेला निरंतर इथे आहे. अक्षरे गिरवण्यात नाही कालवेळ वेगळा इथे आहे. दूर किनारा एक, समुद्र एक इथे आहे. नावांची दोन पिढी पुरती ओळख तात्पुरती इथे आहे. तीन एका पाठोपाठ एक नावांची सुंदर जुळणी इथे आहे. दोन भिन्न शरीरांची जडणघडण एकीकरिता अटूट इथे आहे. सीमित रहित विभिन्न सजीवोपत्ती जगण्याकरिता इथे आहे. असंख्य चलनवलन अंतरिक्षात सांडलेले परिपूर्ण इथे आहे. रिक्त सुखाने आनंदलेले जन जागोजागी इथे आहे...
किती कुठे काय कसे इथे आहे..
...
....
......कारण फुल नाही एक, इथे आहे.. आणि तो हा एक, निमिष इथे आहे.....

रविवार, २९ मे, २०११

होताहोता

जाहल्या हितभर वाटेन-वाटे मनातल्या भावनांच्या.. पडल्या जाणिवांच्या खुणा हृदयाच्या कोपरां-कोपरांत
विचित्र चकमक दिवसभर.. निषिद्ध कलकल रात्रभर..
न हे तुझे दु:ख न ही परिणती कोण्या सुखभर प्रसंगांची., जे दु:खाचे कारण..
कण हे परस्पर मरणाचे आणि अंतहीन विषादाचे शिवशिवतायेत इथे.. स्वप्नभर जगून विरहाचा वणवा पेटवतायेत इथे..

हिस्से झालेल्या भावना जगू न देता कायम मरण्यास ही दुर्लक्षित करतात.
हित विरहित नसलेले हिस्से गोल गोल फिरून जाणीवा धडकवतात गोल हृदयाच्या गाभारात..
गरगर खुपसणारे कुठवर रुतणार त्या लाल गोळ्याला..थडका श्वासांचा सावरतो ठीबकण्यापासून तो लाल गोळा..

कोणास बोलावत होता तो बुडणारा दिवस
आवाज तर आला होता पण कुणी पासंग नव्हता
रात्रभर वेदनेची ज्योत जळत राहे
दु:खाची लव थरथरत राहे रात्रभर..
किसे पुकार रहा था वो डूबता हुआ दिन
 सदा तो आयी थी लेकिन कोई दुहाई न थी

 नसीर
रातभर दर्द की शम्मा जलती रहे
गम की लव थरथराती रहे रातभर..
आपकी याद आती रही..
आपली गाठ सुटण्याकरिता बांधली भराभर..जसा काजवा चमकावा क्षणभर.. 
विलसत होती खूपशी फांदी-फांदीतून पालवी एके दिवशी सळसळ पदभ्रष्ट होण्यासाठी..
लयाचा सुटणार होता बंध संगीतातून आपल्या काही तालदार रचनेपासून..
होता नव्हता सुखनैव प्रसंगाचा भडीमार आपल्या या जालीकेतल्या जगण्यात, केला नाही हिशोब त्या सुखांचा परतून येणाऱ्या दु:खांसाठी.. न हुरळलो सुखास त्या आधी जगलेल्या दु:खभर क्षणांसाठी

कर अवहेलना आयुष्या पुरेपूर .. 
झरणारा वळवाचा पाऊस शोषून न घेता चार महिने विरक्त भटकणारा मान्सूनचा पाऊस हवा धरतीला .. 
मी मला वळवाचा पाऊस राहू दे.. शिणलेले थेंब मिरवत फडकावत बरसेल अन तरसेल हे जीवन माझे इथे.. 
स्वप्नाची हवा राहू दे जीवनात केवळ तो निर्व्याज श्वास घेण्यास मिलनाचा ..
ती पेटेल वणवा शुष्क ठाक झालेल्या या जीवनाच्या जंगलात वियोगाची..केवळ विरहाची.. 
स्वप्नील हवा झुरझुर वारा होईल मग अद्वातद्वा प्रलायाग्नी उभा करायला या जंगलात इथे .. 
होताहोता थांबेल..संपेल हे जीवन माझे श्वास अन पुढचा नसलेला श्वासाच्या अंतरात..
तो एक ठोका चुकलेला असेल..


गुरुवार, १२ मे, २०११

यज्ञेय युग्म..

शालेय जीवनातले किस्से वरनुरूप शेअरेबल वाटत असले तरी मनातल्या मनात अवीट असतात. कसे लहान प्रसंग तेव्हा मोठे वाटायचे आणि अति महत्त्व देण्यास काहीही कारण पुरायचं. मोठी मोठी स्वप्न पाहण्यात मजा यायची आणि खर म्हणजे आता मोठे होऊनही छोटी किंवा मोठी स्वप्ने पाहण्यात धडकी भरते. तसे शाळेतले दिवस लख्ख आठवणारेच असतात अगदी काळोख्या रात्रीपण. एक-दोनदा जीव नकोसा झाला असेलही तेव्हा पण आता त्यावर हसू येते.. वेळेची करामत बघता येते.. त्यापुढे केलेले कल्पनाविलासाचे सात मजले आणि आता वर्तमानातला फरक केवढा अगडबंब आहे. काही मित्र आता चेहरा समोर आल्यावरही लक्षात येत नाही आणि.., अरे हा मित्र कधीकाळचा आपला खास होता.
        यज्ञेय एक मित्र माझा बराच खास आसपास.. त्याची प्रचंड बडबड मला कधी कळायची नाही. मागेल ते द्यायची सवय चांगली होती त्याची पण ती सवय मला कधी आवडली नाही. स्वतःची चिंता वाहण्यातला तो नव्हता. त्या छोट्या दिवसांत त्याने चर्चिले सर्व विषय आता मला एक सुखद ठेवा आहे. शाळेतला असा तसा असलेला पुढे तसा खरा निघाला नाही. शिवाय त्याची बरंच बोलण्याची सवय कामाला आली. फुटकळ नसलेल्या त्या बडबडीला तो शब्द, विषय कुठून आणायचा, निवडायचा माहित नाही. वाचयाचाही यथा-तथा पण चौकसपणा भारी होता. सहलीच्या भानगडी मनात कोरून ठेवायचा..अगदी नकाश्यापासून ते तिथल्या टपर्यापर्यंत. त्याची गोष्ट सांगतो आज.. 
       बिडी सिगरेट दारू या गोष्टींच व्यसन कधीही लागू शकते अर्थात आपला त्यात पुढाकार असला पाहिजे. सांगून सांगून कितीही सांगितले तरी मनाला पटल्याशिवाय आपण ती गोष्ट करू शकत नाही. यज्ञेय ही होता कोवळा आणि व्यसनांची आफत त्यावर आली आणि त्याला निर्णय घ्यावा लागला मनाचा, पुष्कळसा चौकसपणा करून त्याने ठरवले की हा नाद करायचा पण अट एकच की कुणी सोबत पाहिजे.. हे घडलं कसं आणि पुढे काय झालं ते असं..
       यज्ञेय राहायचा आपल्या आजी-आजोबांबरोबर, आई-वडील वारले असावेत ..मी कधी याबद्दल त्याला विचारलं नाही. तर तो एकुलता एक नातू असल्याने त्याची खातिरदारी बरीच असायची. त्याच्या घरीही या तिघांशिवाय कुणी राहत नव्हत. गावात होते मामे-मावशी पण त्यांची सलगी नव्हती यज्ञेयशी एवढी. तर या पार्श्वभूमीवर तो बिघडला कुठे..तर असं..
       माझ्याबरोबर तो असायचा शाळेत, मैदानावर खेळण्यासाठी आणि कधी आम्ही मित्र त्याच्या घरी असायचो..मोठ घर आणि खेळायला मोकळ रान असायचं. त्यांच्या शेजारी एक मांजर पाळलेली होती आणि ती आमच्यामध्ये लुडबुड करायची. तशी ती खूप लाडकी होती. त्या मांजरीला यज्ञेय बराच रुळलेला होता. तर तिचं ठाण या प्रशस्त घरी जास्त असल्याने ती यज्ञेयच्या मागेमागे फिरायची. तिला खाऊ-पिऊ घालण्यात मजा यायची. अशी होती एकंदरीत यज्ञेयची डीम्ड पेटची भानगड. पुढे तर मला जाणवायला लागलं की हा बडबडपुराण आम्हा मित्रात कमी येतोय आणि घरी राहतोय.. घरी त्याच्या खेळायलाही काही नव्हत, एक त्या मांजरीशिवाय टाईमपास नव्हता. मग आम्ही जायचो त्याच्याकडे तर तो मांजरीला आमच्या जवळ न आणण्याचा आणि तो तिच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करत असायचा. मला हे काही गूढ उकलल नाही, तर मी त्याला विचारलं भाऊ तुला काय झालंय आजकल, बिघडलय काही? तर तो हसून टाळत होता मला.
       पुढे पुढे तर त्या दोघांची जोडी ठळक जाणवू लागली. शाळा सोडून तो जिथे जाईल तिथे ती मांजर त्याच्याबरोबर असायची. मी त्याच्या आजी-आजोबांना हे विचारलं तर ते हे ऐकून मला म्हणाले ही गोष्ट आम्हाला तर तुझ्याकडून कळतेय खरचं नवल  वाटतंय  आम्हाला याबद्दल.. तर असो त्यात काय.. पण मला हे यज्ञेय युग्म सॉलिड खुपत होत.. त्या मांजर मालकाबद्दल मला तर काहीच माहित नव्हत या प्रसंगांपर्यंत.. चार पाच बंगले असणारी कॉलनी होती यज्ञेयची. बाजूच्या नेमक्या कुठल्या घरातून येत असावी ही मांजर मला कधी पत्ता नव्हता. एकदा त्याच्या घरी खेळत असता ती मांजर माझ्या अंगावर आदळली आणि कसला तरी विचित्र वास मला चाटून गेला..तो दारूचा होता हे मला तेव्हा कळलं नाही आणि मीपण तेव्हा होतो चौदा वर्षांचा. मी यज्ञेयला विचारलं की ही कुठून येते..तर तो बोट दाखवून सांगू लागला ..त्या घरातून..ते घर फारसं लांब नव्हत पण दिसत होत एकदम भकास. 
      त्या बंगल्याची ठेवण पडक्या वाड्यासारखी होती. मांजर काय इतर पाळीव प्राण्यांसाठीच बांधल असावं असं घर. संध्याकाळी घरी जाताना मी हळूच नजर टाकली त्या घरावरच्या पाटीवर..अरे हे तर गावप्रसिध्द दारुड्याच घर होत..शिवाय बाहेर रस्त्यापर्यंत सिगरेटचा वास घुमत होता त्या वेळी. मी पटकन सटकलो. 
     ती मांजर दारूच्या वासाने भपकलेली होती हे मला कळलं. या प्रसंगांनी माझ डोकं शिणून गेलं. एवढ्याश्या वयात मी जरा जास्त विचार करू लागलो होतो.. तो वास त्या यज्ञेयला गुंगी आणत होता आणि नकळत तो नशेत अडकत होता कोवळ्या वयात.. मन तयार होते त्याचे ग्रहण करायला अश्या गोष्टी आणि सदैव साथ होती मांजरीची त्याला.. अश्या रीतीने कुणी सोबत असल्यावर यज्ञेयचे व्यसनाधीन होण्याचे प्रकार चालू होते.
      यावर उपाय काय होता हे समजायला मला वेळ लागला, साहजिकच होते ते..फार काही करावं लागलं नाही आणि मीही काही प्रत्यक्षपणे केल नाही, आपोआप होत गेलं माझ्याही नकळत..
      त्या दिवशी मी आणि त्याचे आजोबा काही गोष्टी अडगळीतून काढण्यासाठी गेलो. यज्ञेय मएगी आणायला बाजारात गेला होता आणि सोबत होतीच ती मांजर..घरी त्याची आजी मामाकडे गेली असल्याने आजोबांनीच त्याला मएगी बनवण्यासाठी पिटाळल होत.. त्या मांजराचा विषय माझ्या डोक्यात नुसता घुमत होता. तर मांजराची शत्रुत्व असणारी उंदरं.. त्यांच्यासाठी आम्ही तिथे सापळा सापडत होतो. मी आजोबांना विचारलं की हे काय?.. घरात मांजर येत जात असून हा उंदरांचा पिंजरा का पाहिजे..? मग आजोबा म्हणाले अरे ते मांजर नाहीये तो बोका आSहे.. बोका..!!आणि तो उंदीर पकडण्याखेरीज नुसता हलत डुलत फिरत असतो.. काय उपयोग त्याचा..? तर हा सापळा तरी कामाला येईल..त्या आळशी बोक्यापेक्षा.. मग मी बोललो की मागे मी तुम्हाला सांगितलं यज्ञेय त्या मांजराबरोबर सारखा फिरतोय तर तेव्हा का नाही सांगितलं की तो बोका आहे?, आजोबा न आठवल्यासारखे करत आणि त्या वेळेसारखेच... ही गोष्ट तर तुझ्याकडून कळतेय खरचं नवल वाटतंय... असं बोलले..
      माझी अक्षरशः ट्युब पेटली. ती मांजर नाही तो बोका.. अश्या गोष्टी लहानपणी नाहीच कळत लवकर. हे तर काही नाही पुढे तर आणखी गंमत झाली ती अशी..की त्या बोक्याला कुठेतरी दुखापत झाली पायाला आणि तो यज्ञेयच्या घरी पडून राहू लागला.. जसजसे बोक्याचे दिवस लांबले यज्ञेयच्या घरी तसतसे यज्ञेय उठसूट चुळबुळ करू लागला. ही त्याच्या सवयीच्या प्रतीरोधात्मक घटना घडत होती. मी कन्फर्म झालो की हा नक्कीच व्यसनांच्या आहारी गेलाय..
      ही तर झलक होती, पुढे अजून काही बाकी होते की ज्याने सर्व बदलून जाऊन आम्ही एका नवीन विश्वात जाणार होतो.. मांजर मांजर जे काही चाललं होत आतापर्यंत ते अचानक कुठून तरी उगवलं आणि बोक्याभाऊचे दिवस पालटले.. तो शिस्तीत त्या मांजरीबरोबर उंदरं खाऊ लागला..आणि का कुणास ठाऊक त्या मांजरासाठी असेल की काय पण त्या बोक्याला दारूद्याकडे जाण्यात इंटरेस्ट वाटला नाही.. जेव्हा जोडी जमली त्या बोक्या मांजरांची तर आपला यज्ञेय भाऊ ही थोडा उदास राहिला काही दिवस बोक्याविना..पण त्याचे दिवसही पालटले आणि तो तारुण्यात आला. बरा सुटला तो यातून.. आणि आता तो विश्वास ठेवायलाही कदाचित नकार देईल की तो नशेत होता आणि मी ते जाणलं होत सर्वांच्या नकळत...      

गुरुवार, ३१ मार्च, २०११

सब भुला के ..च्या साथीत..

सर्व सारे विसरून सरून ....तरी..ही
सब भुला के ..च्या साथीत..




तुझ्या अबोलात ते बोलणे लपले सारे   [ तेरी खामोशियों वोह बातें है छुपी ]

मला संवेदतात ती प्रत्येक सल खुपणारी   [मुझ को छू लेती है वो हर आह जो यूँ निकली ]



मागच्या वेळचा असलेला आणि आता ही मागच्याच सारखा असलेला अबोला ...तोच जाणवतोय आता बोलण सारकाही तुझं.... ही शांतता असावीच का...
तुझ्या हृदयात असणारी, वेदना आणणारी दु:खे ..दु:खच ना ती सलणारी ..मला इथे स्पर्शतायेत आता हर एक ती... तुझी ही दु:खे असावीच का...




ओलावा जो डोळ्यांत होता  [ नमीं जो आँखों में थी ]

मुक्त झाले ते बोलणे सारे  [ खुली वो बातें सभी ]



भिजणारे अंग सारे अश्रूंच्या विळख्यात या.. ओली राहणारी डोळे ही..  तीच असणार..तीच पुरणार आता
उघडण्यास ही बंद असणारी श्वासे ..मोकळी होण्यास ते बोलणे ...खर अस काही होतंय हे..


सारे विसरून.. तरी चाललो मी  [ सब भुला के फिर भी चला मैं ]

जगाची रहाटी विसरून..  [ दुनिया की रस्में भुला के ]

मला जी हिम्मत मिळाली  [ मुझ को जो हिम्मत मिली ]

माझ्या हृदयात वाढत राहिली........... [ मेरे दिल में बढ़ती रहीं ]



विस्मरण ही देणगी लाभलीय हेच बर..
असली ही जग रहाटी अन ती निष्फळ उमेद..दोन्ही विसरण्यास कारण लागत नाही..
त्यातूनच जी दृढता लाभली ...जणू काही कळतच नाही काय हे मिळालय..
पण खंबीर मार्गदर्शकपणे माझ्या हृदयात हे ठसलय..



मी ही या अश्रूंमध्ये बुडलोय किती दिवस  [ मैं भी इन आंसुओं में डूबा हूँ कितने दिन ]

स्वतः शी सांगू शकेल जगलो तुझ्याशिवाय  [ खुद से कह सकूँगा जिया हूँ तेरे बिन ]


परत अश्रूच.. त्यात तरंग विरहाचा.. रेषा अधीर जीवाची.. अनेक दिवसांपासून पूर्ण न चितारलेले नक्राश्रू ....शेवटी आपल्यालाच न समजावून जगण्यात आणि तू नसलेली जाणीव जगण्यात माझे मी दोन वेगळे होतायेत..


आनंद जो बोलण्यात होता  [ ख़ुशी जो बातों में थी ]

मुक्त झाले ते बोलणे सारे  [ खुली वो बातें सभी ]




खूप आनंद होता तो बोलण्यात.. आणि आनंदातल बोलण ही होत..
ते सारे बोलणे मला परत मिळालेय..



सारे विसरून.. तरी चाललो मी
जगाची रहाटी विसरून..
मला जी हिम्मत मिळाली
माझ्या हृदयात वाढत राहिली...........

ओलावा जो डोळ्यांत होता
ओलावा जो डोळ्यांत होता
मुक्त झाले ते बोलणे सारे

सारे विसरून.. तरी चाललो मी
जगाची रहाटी विसरून..
मला जी हिम्मत मिळाली
माझ्या हृदयात वाढत राहिली...........


सारे विसरून.. तरी चाललो मी
जगाची रहाटी विसरून..

[ आय एम ट्रायीन टू लाफ, सिन्स आय डीद्न्त सी यु एवर वर लाफिन ]

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०११

नश्वर नसणारी.....


रात्रीत स्वप्न पडल्यामुळे जुएव हबकून जागा झाला..

ठरवून ठरवून खेर्वून आणि कुमार यांची मरणाची विदारक अवस्था झोपल्यावर का नजरेसमोर येते याचा विचार करत तो उठला..

कुठल्याश्या दिव्याखाली रस्ता संपत नाही तोपर्यंत निरर्थक फिरत, विचार करत बसला..

"माझ्या सदोदित सोबत बहरणारा वोकॅलिस्ट खेर्वून हा एक समग्र अनुभव विश्वच ..तसच..
प्रगल्भ इंडिअन पोएट कुमार माझ्या मनाच्या कितीसा दूर..नाहीच तो!....यांचा मानवी मृत्यूत अंत मला नेहमी का खळवळवतो...
---अनुभवांचा डबकेपणा आणि डबक्यांनी अंथरलेले अनुभव या गुंत्यात मनाचा व्यापकपणा, कल्पनेच्या भरारी यांना अर्थ कुठे असणार..
...असंही शरीर ही गोष्ट खूपच डबकेसिद्ध ..अशी निरंतर,
शरीर जपावं..गोंजारावं..पोसावं...स्वार्थी व्हावं...व्यापक-कल्पनातीत मनाची लालसा त्याचमार्फत पूर्ण करावी...

पण जरा एखाद्या वेगळ्या व्यक्तीत ..वाढलेल्या शरीरात ..व्यापक झालेले त्या व्यक्तीचे मन ..त्याच शरीरातून अनुभवायचं...
---असं तर निव्वळ अशक्य...
.....

जगण्यातली साचलेली विचित्र अवस्था सदैव अस्वस्थ करायची, मग ती अश्यारितीने उफाळून वर येणारच..."


या समेवर येत तो दूर विहित शहराचा परिश्रांत नजारा नजरेत साठवत परतला......................



..

शनिवार, २९ जानेवारी, २०११

वेग..

दर रात्री आठवणारा प्रसंग झिडकारून जुएव तयार होऊ लागला. निवडलेली कपडे अर्ध्यात अंगावर सरावलेली होती, ती पूर्ण निस्तरून तो थंडीचा अंदाज घेऊ लागला. टेंटची बांधाबांध आता संपली होती. भारत यात्रेस येण्यास खेर्वून एवढा पुढाकार का घेत असे, हे त्याला इथे येऊनही उलगडले नव्हते. तीन वर्षभरापासूून कुमार त्यासाठी समजावत होताच; आताही तसाच डोळ्यासमोर उभा आहे..सुवास भरून खोल पोहचावा संंपूूर्ण शरीरात, तसा अगदी भास त्याला त्याच्या समजावणुकीत जाणवत असायचा..

"हॉव    मेंतेंद इन दिस कॉल्ड?".. कुमारने त्याला पुकारल, नकळत आपण त्या थंड गार प्रसंगाची जाणीव करून दिली, असे वाटत तो जुएवला निरखू लागला.
गंध जवळून जातोय अस वाटत जुएव त्याला हुंकारला. कधीचा तयार असलेला कुमार जुएवसोबत निघाला.  
"होप वी'ल सी सन रेज इनसीदेंतली! "
किर्र.. किर्र.. रात्र सरतेय आणि पावले वेगाने वर सरकतायेत..
दाट अंधारात केवळ कुमारला धुंडाळत वेग गाठण्यात जुएव कमी पडत होता, भारताची दुरकिर्ती असावी निशाचरांबद्दल... अस काहीस मनात बडबडत..

भारताच्या अतोच्च थंडमय परिसराला जुएव सहज जुळून गेला..
पावलांच्या आवाजाची पाठराखण करताना त्याचा शिखराकडे जाण्याचा निश्चय अधिक दृढ होत होता. कुमारला असलेली कणकण त्याला ठाऊक नव्हती. थंडी भरल्या मोसमाची उच्चता भारतातल्या जीवांची अधिक हानी करते हेही त्याला माहित नव्हत..

सुगंधाची झुळूक वारंवार येत होती.. गडद शांतता, प्रफुल्लीत वातावरण...तसा जुएव सुखावला..
खरच भारताचा पत्ता आतापर्यंत आपल्याला का माहित नव्हता.. असा विचार करत..
बर्फ झरझरू लागला आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही..दोन वर्षापूर्वी हरवलेली गोष्ट सृष्टी उलगडवत होती..
"हम्म..स्नो फॉल..!!!!"
"...."
"हेय.. एर उ ऑलराईट..?" त्याला कुमारचा हात गरम अति उष्ण जाणवला ..
मागे वळत श्वास घेण्यासाठी दमछाक होणारा कुमार जुएवच्या अंगावर लपेटला..नाही जणू कोसळलाच..
अंधारात खांद्यावर रित झालेलं त्याच कलेवर न जाणो किती वेळ जुएव निरखत होता..

एका मृत कस्तुरी-मृगाच्या सुगंधात..





पुढे

शुक्रवार, २८ जानेवारी, २०११

थाप...

जुएव वरून सारखा पाहत होता. दारावर थाप पडल्यास आणि त्याची झोप डोळ्यात उतरल्यास काही एक क्षण गेले असतील.
कानाची गरम पाळी किंचितशी संवेदली, तेव्हा त्याला जाणवलं कि वाट बघावी ती कुठवर... टेरेसलाच बसून, आपणच काही कराव..
ठप .. ठप..
हम्म.., आला असावा तोच..
तिरकी मान आणि हात वर ओढून आळोखा देतच तो ओरडला..."काम्मीन बेब.."
खेर्वून नसता वेंधळाच  आहे...अस काहीस मनात बडबडत.. उतरला..
खर्रकन... हात बाजूला होत, समोर बघत त्याने डोळे मिचमिचे केलेत.

तेच अश्या पद्धतीने दारावर थाप मारणारा कोण ? याचा उलगडा त्याला झाला..
झपकन तोंड त्याच्या पायाशी नेत वुइन्ग.. वुइन्ग.. आवाज करत मर्फी कुटुंबियांची कुत्री त्याला सामोरी गेली...
या अनपेक्षित प्रकारावर भांबावून जुएव तसाच ओरडला.."व्हेर यु इन ब्रीझ्द मर्फी बिच?.."
शेपटी भराभर हलवत विव्हळणारी ती, असली तिची अवस्था तो पहिलांद्याच बघत होता..
काही तरी भयानक घडल्याची सरसर जाणीव त्याच्या मनाला स्पर्शून गेली..
त्याची नजर तिच्या भेदरलेल्या डोळ्यात साठली..
इतक्यात क्षण होतो न होतो.. तोच ती पाठमोरी होऊन बर्फ भरल्या अंगणात पळू लागली.. त्याला अर्थार्थी समजावत..
झपाझप पाय खुपत जाणारी, तो बघत थबकलाच..
एक थंडीची जाण न राहता तोही तिच्यामागे धावला..
खेर्वूनची प्रिय लाडकी, मला नेहमी टाळणारी.. आज मला काय सांगायचा प्रयत्न करतेय हे त्याला कळेनास झालंय..त्याच्या मनात 
खेर्वूनच्या कारला छिन्न भिन्न अवस्थेत पाहताच तोही भेदरला..
आणि ..तो पुढे बघायच्या आधीच खाली कोसळला..


एक जोरात भुंकण्याच्या पलीकडे तिथे केवळ शांतता होती..काय माहित कुठवर..कधीस्तोवर....पुढे 

मंगळवार, ४ जानेवारी, २०११

शरयू-गंगा मिलन

ब्रह्मा
मरिची
कश्यप
आदित्य
वैवस्वत मनु
इक्ष्वाकु
शाषद
पृथु
आर्द्र
श्रावस्त
प्रसेनजित
मांधाता
अनरण्य
वसुमत
सत्यव्रत
हरिश्चंद्र
वृक
बाहू-असित
शक-हैहय-यवन-तालजंघ त्रासास कंटाळत,
असित वनात निघून जात,
गर्भित दोन पत्नीस सोडून मरणास कवटाळत,
असित पत्नी कालिंदी सतीस जाण्यात पण,
च्यवन आश्रय देत,
पुत्र सगर विष-उत्पन्न होत,
भृगु आशीर्वचन देत,
भार्या-सगर सुमतीस साठ हजार पुत्र होत,
विदर्भ कन्या सगरपत्नीस असमंजस होत,
शरयू नदीत असमंजस योगभ्रष्ट होत,
असमंजस वनात योगी होत,
अंशुमान सगरपौत्र होत,
आग्न्येस्त्र सगर ब्रह्माकडून प्रदापित करत,
सगर शक, यवन, हैहय, तालजंघ नष्ट करत,
हैहय वशिष्ठ शरण जात,
सगर हैहायास अभय देत,
सगर-अंशुमान अश्वमेध यज्ञ रचत,
इंद्रास देवेन्द्रपद डगमगलेले दिसत,
विष्णुरूपी कपिल आश्रमात अश्व चोरून लपवत,
वीर सगर षतशत-सहस्त्रक पुत्र समुद्र लोटत,
पातळी कपिलधामी अश्व बघत,
अखंड अविरत कपिलतपस्या खंडित होत,
सगर पुत्र भस्म होत,
अंशुमान विनीत होत,
कपिल ऋषी उ:शाप देत,
अंशुमनपुत्र दिलीपची तपस्या असफल होत,
अंशुमनपौत्र भगीरथ तपस्यास पूर्णत्व प्राप्त करत..
सागर नाम समुद्रास मिळत,

गंगा अवतरणार असेल तर


 
शरयू गंगेस उपनदी होणार..

शरयू नदी गंगेस अतिप्राचीन पण मार्ग सुधारित प्रवाहित होते?

मंगळवार, २६ जानेवारी, २०१०

कफल्लक जीवन माझे
विकार सारे मन माझे

कंठात वार महफिलीचे
कानात स्वर क्षण माझे

ऋतू सुरु नव साजाचा
शिशिर गार मन माझे

विस्कटून घडी भूकंप
पेरतो बीज ऋण माझे

नाही नाही हाच स्वीकार
मरण सुन्न जन माझे 

रंगवेडी जी रीत नाही
का प्रीत अशी स्वप्न माझे

उधळ तो अबीर धुंद
छंद पंढरी सण माझे

विशाल काया रेवा अशी
दोन शकले गण माझे 

केवळ तूच विनाशील
कठोर क्रूर पण माझे



Related Posts Plugin for WordPress, Blogger...