भय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

खुलवणारी....

खुलवणारी रात्र होती पण ती खुललेली नव्हती.
तिचा नाट्यमय राग दूर कुठे निघून गेला होता.
उदास तिच्या नजरेत भारलेला भूतकाळ व्यापला होता.
मागमूस नसलेला चिरकाळ छळत राहिला होताच पण प्राणाहून प्रिय तो आज छळ मांडणारा झालाय हे नकोसेच होतंय तिला....

तलमी झंकाराने मोहरणारा तिचा तो आज अतृप्त अतृप्त वागत होता. नाद सभोवताल छेदत तिला कवळून घेत होता. टोचणारे भस्म लावल्यासारखे ती तळमळून उठत राही आज......

तिच्या मागच्या जन्मी माणसाने रिक्त जगी भावनांची उजळणी झाली होती. ती रिक्तता या जन्मी मोकळी करण्यास मनोमन थिरकणारी तिची माणसी चर्या आज उद्वेगाने उजळून उठत राहतेय.....
चाप भाकितांचा रुतणार कि नाही प्रत्यक्षी...

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११

असंबंद्ध



माजलेले रण खोल कुठे..
आणि गावागावात हवा जड होऊ लागलीय.. मनाला बोचणारे वार उघडउघड दिसू लागलेत...
दूर अंधारातील खोलीतून येणारे स्वर पार पोहचले आहेत..नकोश्या त्या जन गर्तेत..
शब्द सुचणारी रूचक भाषा नव्हती तरी तिथे पोहचण्यात भाषेला निर्बंध नाहीत..
    सूर येति विरून जाति.................................................................................................                   
दीन हृदय हुंकार विरतो आहे
मज स्वर वार सहन होत नाही...

गजांनी बंद ऋतूंचे जीवन हेतुपुरस्सर विणलेले..
तोडक्या भूमीत कचणारा सहावेळा नाच, केवळ

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०११

मिरुत

गाव 
गावात ऊन
ऊनात पाखरे
पाखरांना पाणी
पाण्यात मासे
माशांना भूक
भुकेस फिरून भूक
भुकेला माशास भुकेला माणूस
माणसास अनंत मान
मानाला मान
मानास अनंत दिशा
दिशेला चार दार
दारांना चार भिंती
भिंतीस भिंत
भिंतींना चोराची भीती 
चोरास भीती दिवसाची
दिवसास एक सूर्य
सूर्यास एक पृथ्वी
पृथ्वीस एक चंद्र
चंद्रास एक रात्र
रात्रीला चोर
चोरासमोर भिंती
भिंतींना दार
दार पूर्वेला
पूर्व मानाची दिशा
मानाला एक माणूस
माणसाला एक भूक
भुकेला मासा
माशास पाणी
पाण्यास पाखरे
पाखरांचा दिवस
दिवसा ऊन
ऊनात एक गाव...    

मंगळवार, ७ जुलै, २००९

भय इथले संपत नाही...

भय इथले संपत नाही
भय इथले संपत नाही...
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो..
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविले गीते..

भय इथले संपत नाही
भय इथले संपत नाही...

ते झरे चंद्र सजणांचे
ते झरे चंद्र सजणांचे..
ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांशी निजलो आपण..
झाडांत पुन्हा उगवाया

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..
भय इथले संपत नाही....

तो बोल मंद हळवासा
तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला...
सीतेच्या वनवासातील
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघव शेला ..

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..
भय इथले संपत नाही....

स्त्रोतात इंद्रिये अवघी..
स्त्रोतात इंद्रिये अवघी
गुणगुणती दुख कुणाचे
हे सरता संपत नाही
हे सरता संपत नाही....
चांदणे तुझ्या स्मरणाचे

भय इथले संपत नाही
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते...

मी संध्याकाळी गातो..
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविले गीते..

भय इथले संपत नाही
भय इथले संपत नाही

- ग्रेस
Related Posts Plugin for WordPress, Blogger...