दिवस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दिवस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१२

उगवते तेज

मला माझे रुदन सापडत नव्हते..
काल सकाळी उगवत्या तेजात सामावलेले मला माझे रुदन..कळले ते कोठे आहे...

...मावळतीची वेळ आणि मी त्यास अर्था-अर्थी दूर लोटतो..


तरीच हे उसन्या कालचक्रात गोठलेले जीवन.. ते ढकलण्यास उसना उत्साह..
त्या उत्साहात उत्सवही येतो उसनाच....

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०११

मिरुत

गाव 
गावात ऊन
ऊनात पाखरे
पाखरांना पाणी
पाण्यात मासे
माशांना भूक
भुकेस फिरून भूक
भुकेला माशास भुकेला माणूस
माणसास अनंत मान
मानाला मान
मानास अनंत दिशा
दिशेला चार दार
दारांना चार भिंती
भिंतीस भिंत
भिंतींना चोराची भीती 
चोरास भीती दिवसाची
दिवसास एक सूर्य
सूर्यास एक पृथ्वी
पृथ्वीस एक चंद्र
चंद्रास एक रात्र
रात्रीला चोर
चोरासमोर भिंती
भिंतींना दार
दार पूर्वेला
पूर्व मानाची दिशा
मानाला एक माणूस
माणसाला एक भूक
भुकेला मासा
माशास पाणी
पाण्यास पाखरे
पाखरांचा दिवस
दिवसा ऊन
ऊनात एक गाव...    

गुरुवार, १७ डिसेंबर, २००९


काही दिवस असे सरतात की आवरता येत नाही
आजच सरतील हवेहवेसे क्षण सांगता येत नाही

मागचे असे काही लपून ठेवले की आठवता येत नाही
असेच असेल तर का लपलेली दु:ख विसरता येत नाही

निजुन पडते स्वप्न असे की जपून ठेवता येत नाही
संभ्रमता अशीच राहिली तर रात्र ही जगता येत नाही

हताश निरंतर आयुष्य उरेन की संपवता येत नाही
नाहीच तुझी भेट मग का ओढ तुझी कुरवाळता येत नाही
Related Posts Plugin for WordPress, Blogger...