रात्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रात्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ३१ मे, २०१२

दु:खाश्रित

हुंकाराचा नश्वर साज.. देऊ दे रे मला आज.. निग्रहांकित मनाच्या कोन्यात उतरलेले हसरे पाऊल.. रगीत सुखाची लिप्त पाकळी.. नि:संदेह मागणारा वारा लुटायला लागला तर रात्र सारे देत-देत विसरते, लुटार्‍याकडून मागणे होतेय विरघळून जाते ती पहाट वार्‍या.... रानदिवा विझला जाईल सर्वस्व समरसून वाहता....

दुरित, ती पापं भोवतात...परिसरात विखरून टाकलेली विषाग्नी जशी, कुठे सलता फिरकणारा पिंगा सोबत करत राहतो..तीच पापं एका चक्रात बांधायला....

केविलवाणा नयकर डोळ्यात उतरत राहतो त्या भर संध्याकाळच्या रंग-मोसमात..त्याचे बापडे सूर गलबलत कंठाशी फिरून जातात.. त्याची मोहमयी दार्शनिक अवस्था फक्त सर्वात लपेटून जाते....... हृद्य असे काही निसटू लागते..,

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१२

उगवते तेज

मला माझे रुदन सापडत नव्हते..
काल सकाळी उगवत्या तेजात सामावलेले मला माझे रुदन..कळले ते कोठे आहे...

...मावळतीची वेळ आणि मी त्यास अर्था-अर्थी दूर लोटतो..


तरीच हे उसन्या कालचक्रात गोठलेले जीवन.. ते ढकलण्यास उसना उत्साह..
त्या उत्साहात उत्सवही येतो उसनाच....

रविवार, १५ जानेवारी, २०१२

गूढ रम्य मालिका


घेऊन मनात असंख्य भ्रम मी खास तयार झालो. माझ्याच मनाची तगमग शांत करण्यास आज मी सज्ज झालो.

परिजन डोळ्यात आणून डोह ओलांडत जावे असे काहीसे वाटते. तुटून एकापरी दुसरे जीवन जगावेसे वाटते. दूर

निष्ठांची एक मालिका तरंगत हेलकावणी देत मला तळमळवत असते. दिव्यांचा अंधार-दरीत सजलेला उपसंहार

पलिकडे मला रिझवणार असतो. शांत जागेस अगदी उभ्या सभेने तीन जगांचे, काळांचे, ऋतूंचे मापं छेदत मी

जात असतो. लिहावेसे काही दूर निष्पाप दूनियेचे मला एक अप्रूप असते. घनीभूत होतात शब्द.......

..................तिथली मालिका शिरते गूढ रम्य देशांत....., जिथे मीच आपला नामशेष झालेला असतो.

मायबोली या संकेत स्थळावर वरिल भाग yachwishay या नावाने मी प्रकाशित केला आहे.

रविवार, २५ डिसेंबर, २०११

आजा मोरे..

आजा  मोरे  नैनों  में  साजना
मैं  तो  तन  मन  दारुं  गी  वार

रूंग  रूंग  में  बस  गयो , तुम  प्रीतम  प्यारे
साँस  साँस  मोरी  हर  घडी , तोरा  नाम  पुकारे
मैं  तो  हो  चली  बावरिया  रे
आजा  मोरे  नैनों  में  साजना

साँझ  रात  तोरी  राह  तकूँ , कहीं  चैन  न  आये
तुम  जो  मोरे  पास  नहीं , मोहे  कछ  नहीं  भाये 
मैं  तो  भूल  गयी  हार  सिंगार  रे
आजा  मोरे  नैनं  में  साजना 


कुठे आहेस.. माझ्या डोळ्यात सामावून जा...
मी पुरती व्यापलीय तुझ्यानेच....

फार फार रुतलीय तुझ्यात, तू प्रिय प्रेयस...
श्वास श्वासात माझे पळ, तुझे नाव पुकारे
मी तर होत आहे लाजेने चूर.. रे..
कुठे आहेस.. माझ्या डोळ्यात सामावून जा...

सायं रात्र तुझी वाट पाहत, कुठेही चैन न राही..
तू माझ्या जवळ नाहीस, मला काहीच भावत नाही...
मी तर विसरले सजणे सवरणे...रे
कुठे आहेस.. माझ्या डोळ्यात सामावून जा...




सोमवार, ५ डिसेंबर, २०११

खुलवणारी....

खुलवणारी रात्र होती पण ती खुललेली नव्हती.
तिचा नाट्यमय राग दूर कुठे निघून गेला होता.
उदास तिच्या नजरेत भारलेला भूतकाळ व्यापला होता.
मागमूस नसलेला चिरकाळ छळत राहिला होताच पण प्राणाहून प्रिय तो आज छळ मांडणारा झालाय हे नकोसेच होतंय तिला....

तलमी झंकाराने मोहरणारा तिचा तो आज अतृप्त अतृप्त वागत होता. नाद सभोवताल छेदत तिला कवळून घेत होता. टोचणारे भस्म लावल्यासारखे ती तळमळून उठत राही आज......

तिच्या मागच्या जन्मी माणसाने रिक्त जगी भावनांची उजळणी झाली होती. ती रिक्तता या जन्मी मोकळी करण्यास मनोमन थिरकणारी तिची माणसी चर्या आज उद्वेगाने उजळून उठत राहतेय.....
चाप भाकितांचा रुतणार कि नाही प्रत्यक्षी...

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०११

मिरुत

गाव 
गावात ऊन
ऊनात पाखरे
पाखरांना पाणी
पाण्यात मासे
माशांना भूक
भुकेस फिरून भूक
भुकेला माशास भुकेला माणूस
माणसास अनंत मान
मानाला मान
मानास अनंत दिशा
दिशेला चार दार
दारांना चार भिंती
भिंतीस भिंत
भिंतींना चोराची भीती 
चोरास भीती दिवसाची
दिवसास एक सूर्य
सूर्यास एक पृथ्वी
पृथ्वीस एक चंद्र
चंद्रास एक रात्र
रात्रीला चोर
चोरासमोर भिंती
भिंतींना दार
दार पूर्वेला
पूर्व मानाची दिशा
मानाला एक माणूस
माणसाला एक भूक
भुकेला मासा
माशास पाणी
पाण्यास पाखरे
पाखरांचा दिवस
दिवसा ऊन
ऊनात एक गाव...    

गुरुवार, १६ जून, २०११

रात्र

मनस्वी स्वीकार
मनाचा नव्हता ...
निसर्गाने आव आणला होता.. म्हणून नाटक होते ते..
चिता जळून जातांना नर्मदा आज सरकत नाही तीरावर.. तिलाही नाटकीपणाचा तिटकारा असावा..
भडभडत्या आगीत एक जीव शांत होता ..नाटकातला..
शीतल मधुर चांदणे होते त्याच्या चहूकडे..पण तो आगीत होता..नट होता तो सूर आळवणारा..
हा सुर नर्मदेच्या तीरावरचा.. इथल्या चांदण्यांचा खच.. मिळालेला ताल त्यात मिणमिणता..
  सृजनाची नांदी हीs...
  मन-सागर हा सखा..
आठवणींचा साज आवाजाला..खदखद मनातली आगेतून विरून जात होती.
त्यानंतर..
सूर्याची सुरावट सकाळी सुरु सुरळीत ..


शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०११

नश्वर नसणारी.....


रात्रीत स्वप्न पडल्यामुळे जुएव हबकून जागा झाला..

ठरवून ठरवून खेर्वून आणि कुमार यांची मरणाची विदारक अवस्था झोपल्यावर का नजरेसमोर येते याचा विचार करत तो उठला..

कुठल्याश्या दिव्याखाली रस्ता संपत नाही तोपर्यंत निरर्थक फिरत, विचार करत बसला..

"माझ्या सदोदित सोबत बहरणारा वोकॅलिस्ट खेर्वून हा एक समग्र अनुभव विश्वच ..तसच..
प्रगल्भ इंडिअन पोएट कुमार माझ्या मनाच्या कितीसा दूर..नाहीच तो!....यांचा मानवी मृत्यूत अंत मला नेहमी का खळवळवतो...
---अनुभवांचा डबकेपणा आणि डबक्यांनी अंथरलेले अनुभव या गुंत्यात मनाचा व्यापकपणा, कल्पनेच्या भरारी यांना अर्थ कुठे असणार..
...असंही शरीर ही गोष्ट खूपच डबकेसिद्ध ..अशी निरंतर,
शरीर जपावं..गोंजारावं..पोसावं...स्वार्थी व्हावं...व्यापक-कल्पनातीत मनाची लालसा त्याचमार्फत पूर्ण करावी...

पण जरा एखाद्या वेगळ्या व्यक्तीत ..वाढलेल्या शरीरात ..व्यापक झालेले त्या व्यक्तीचे मन ..त्याच शरीरातून अनुभवायचं...
---असं तर निव्वळ अशक्य...
.....

जगण्यातली साचलेली विचित्र अवस्था सदैव अस्वस्थ करायची, मग ती अश्यारितीने उफाळून वर येणारच..."


या समेवर येत तो दूर विहित शहराचा परिश्रांत नजारा नजरेत साठवत परतला......................



..

सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

...नश्वर आठवणी

चांदण्यांनी भरलेली रात्र.
कुठ येऊ भेटण्यास,


दुःख विलाप करण्याकरिता लाभलेली रात्र..

रविवार, १७ ऑक्टोबर, २०१०

अश्या निराळ्या..

कठीण मखमालीत..
हव्याहव्याश्या छळण्यात..

कुठवर असणार........ मी आणि..
नसलेली दु:ख ..

खोल जाणवतय नक्की.. दूर जाणार मखमली पासून...हवेपणा पासून...

"ऐकल आहे, दिवसा त्याला फुलपाखरू छळत असतात..
ऐकल आहे, रात्री काजवे थांबून नजरेत साठवत असतात..

ऐकल आहे, वेदनेचे स्मारक आहे देखण अभिनयपूर्ण त्याच..
तर मी ही त्याच्या गल्लीवरून जाऊन बघतो.." -  अहमद फ़राज़

शनिवार, ३ ऑक्टोबर, २००९

नासिर


गेल्या दिवसांच्या खुणा घेऊन, कुठून आला कुठे निघून गेला तो..
विचित्र परिचित पण अनोळखी होता, मला तर हैराण करून गेला तो..

बस एक मौतिक (मोतीसारखी) छबी दाखवून..
बस एक मौतिक (मोतीसारखी) छबी दाखवून..बस एक गोड (सुरेल) धून ऐकवून
सायंतारा बनून आला, स्वप्नील पहाट बनून गेला तो....

ना आता तो आठवणींचा चढता दर्या
ना सवडीची उदास चर्या...
अशीच जराशी सल आहे हृदयात..अशीच जराशी सल आहे हृदयात
जो घाव खोल होता, भरून गेला तो..

तो वियोगाच्या रात्रीचा तारा...
तो वियोगाच्या रात्रीचा तारा, तो सखा काव्यमित्र आपला
सदा राहो त्याचं नाव प्रिय ... सदा ...राहो त्याचं नाव प्रिय
ऐकले आहे, काल रात्री मरून गेला तो...

तो रात्रीचा कंगाल मुसाफिर...
तो रात्रीचा कंगाल मुसाफिर...
तो तुझा कवी तो तुझा नासिर (चाहता)
तुझ्या गल्ली पर्यंत तर आपण पाहिले होते परत काय माहित कुठे निघून गेला तो...

गेल्या दिवसांच्या खुणा घेऊन, कुठून आला कुठे निघून गेला तो..
विचित्र परिचित पण अनोळखी होता, मला तर हैराण करून गेला तो...

नासिर


Related Posts Plugin for WordPress, Blogger...