शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

संवाद

मी जगलेला अंधार दरीत दिसेल हे माहित नव्हते. 
सारून प्रकाश मी तिथे असेल हे माहित नव्हते. 
जडलेले नाते होते; सडून जाणारा वारा खोल कसा तरी खुपायचा, मारायचा असंबद्ध..
मारलेली खून कुणी कशी जपायची; तो कुठे जाऊ द्यायचा..
अन्याय्य होता कि नसलेल्या न्यायाने मी जगत होतो?
संवाद भरपूर होतो रात्रीच्या काळोखात आणि कोठे सापडलेल्या अंधारातही.. न अधांतरी जड पूर्णजड गोठलेला; रुतायचा फार खूप दिशाहीन करून टाकायचा.. न आवडता फुलायचा दूर अनोळखी तो संवाद.. हो संवादच मला हवाहवासा....
तोच प्रत्येक मनातला ओरखडा मी पाहिला दरीत मला कल्पना नसताना... एकाकी असताना...
होताच नक्की तिथे कोणी मी असलेला.... न दिसणारा मी आणि
त्याच्या भविष्यातला त्याला जाणवणारा, पाहणारा त्याचा आताचा मी.. यात आता प्रत्यक्ष संवाद....

1 टिप्पणी:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...