बुधवार, ८ ऑगस्ट, २०१२

गृहत् निष्ठा

निष्ठेची प्रस्तावना -
पदोपदी खचणारी.
द्वय थाटणारी.
परिणामांकरिता झगडणारी निष्ठा खरेच मागणे, हे जाणिवांच्या अलीकडे मांडून देणारा चित्राचा खेळ दिवसा उजेडी भूल-चकमा देऊन कधी त्यापलीकडे जातो ते कळत नाही तसे आहे..

निष्ठेची पार्श्वभूमी - 
असे लिहिले होते वाक्यांना गुरफटून आणि विस्कटून की आकांताने काठोकाठ मन:पटलावर यावे. 

निष्ठेचे कार्यफळ - 
विचीत्राची मर्यादा आखून करता येईल, हा आडाखा त्या पाऊस जिरण्यास लागू होईल हे, ते सर्वतोपरी मान्य होईल, म्हणजे, जे निसटून जाण्यात आहे ते सोपे नाही ह्या मान्यतेने व्यापले आहे.

निष्ठेचा शाप - 
झोपेची तमाम चिन्हांची बक्षिसे हडपून जातील, वर मळभाच्या चिन्हांची रोपं पेरली जातील त्या रात्रसदनात..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...