बुधवार, २७ मार्च, २०१३

पहिल्या पहाटे

मग तो निसटला, त्याच्या पायाला लागणारी वजनदार साखळ्यांची सणसण बंद झाली.
घरी मागच्या वेळी असलेले तेच गुलाबाचे काटे मागच्याच खिडकीकडे पाठमोरे स्वागताला होते. त्याच्या निखालस डोळ्यांना सुहास्यपूर्ण चमक चढली. पाठीला टसटस करणारे पिटिका त्या गुलाबी काट्यांसरशी शहारले. मेंदूत मग चेतारज्जू ठिकाणावर आहेत हा विचार आला, ठिकाणावर आता असणे काय आणि मघाशी नसणे काय तो सूर्यास्त अजून आहे तसाच आहे ..तिथेच.
पापणी न लवता केलेल्या सूर्यास्ताला विनवण्या आज संपल्या. तोच सूर्यास्त वेळ पाळून ठिकाणावर आला आहे, आज विनवणी तर नाही पण हे घर, हे नुसते काटेरी गुलाब, ह्या ठिकाणांचे संदर्भ मावळू देण्याची वंचना त्याला हवी.
तो आता सूर्योदय मागतो.

गिरमिट पावलांची डोळ्यांवरून जाता जात नसलेली नक्षी.
किर्र संतोष अंधारलेल्या पापण्यांत मावतो, फार अपेक्षा बांधून त्या थकल्यात आत्ता.
चिमण्यांची लगबग सुन्न मनात घुसडते.
सोलत जाणारे गाल अश्रूंना समईच्या काळाकभिन्न शाईने सलाम ठोकतात, कसलासा अभिमान नांदवत. ती समई तेवली नको तेवढी.
मनाचेच खेळ, मनाचेच विकार अश्या शब्दांनी दिलासा पेरत.

२ टिप्पण्या:

  1. असाच नेमका निसटतोस तू...

    सूर्यास्ताच्या विनवण्या आणि सूर्योदयाच्या आशा...
    काही काही थांबवत नाही तुला..
    पण मग धावून धावून धापा टाकत थांबणाऱ्या उंबरठ्यावर घराचे मंगल चिन्ह उमटत नाही का मनावर ...

    बघ... विचार कर...
    किंवा करू नको ही ...
    पुन्हा एकवार मनाचे खेळ म्हणून उडवून लाव बर नेहमीसारखे...

    सखी !!

    उत्तर द्याहटवा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...