बुधवार, २ नोव्हेंबर, २०११

तुकडा

मगाचचा तुकडा हरकत नसताना गरगरला..
तोडल्या जीवास मागमूस असतोच आपण उरतोय एकटे.. तुटतंय काही..
ती खंत डोळ्यात भरून तो तुकडा मर्माचा, गरगरत मी काही बोलू इच्छितो म्हणतोय..
तो पाहतोय प्रत्येक खुण त्याच्या भोवती घेरलेल्या वाटांत.., तिथे जर्द झालेल्या तुटलेपणात; जपलेली, हरवून गेलेली, दरवेळेस हवी असणारी आणि कितीक.. 
अवगत दार भूतकाळात होते फार ते, पलीकडे जायचे आज गरगरताना आठवत राहते...
दाराशी मागतांना होता गर्द त्याही मागचा भूतकाळ........... आता तो भूतकाळ आणि मागणे दोन्ही विरले कुठे.. बोलतोय तुकडा...
फासलीय मी गार नदीतील खोल माळलेली खडक रांग अंगाशी रे.... बोलतोय तोच..
मावळून गेलेली किरणे उपसतोय ज्या क्षणात की त्यात क्षणोक्षणी हरपलोय अन् हरवतोय मी... पडलोय अपुरा.. तो

झर्रकन् तोच विलगला अस्तित्वाला छेद देत..
जन्मोजन्मी मान्य असलेली गूढ कहाणी पुरी करत ते पान अखेर विसावलेच जमिनीवर तिच्याच रंगात कधी न असण्याकरता.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...