सोमवार, १४ सप्टेंबर, २००९

मनाचे काही विचार

मनाचे काही विचार आपल्याच मनातून येत असतात की नाही,
माहित नाही...
पण येणारा प्रत्येक विचार आपलाच एक भाग असल्यासारखा,
आपण त्यावर विचार मंथन करत असतो....
त्या विचार मंथनातून आपल्यासाठी काही मिळेल अस पण नक्की नसत...
परत ते विचार त्यानंतर कुठे जातात हे सुद्धा आपल्याला कधी कळत नाही..
अस हे अथांग आणि अखंड चालणारे, प्रत्येकाच्या मनात सुरु असत....

त्यात काही विचार काही लोकांना काही वेळा समान येत असतात,
नसेल ही असं....
मग समविचारी लोकांना एक आपुलकीची भावना वाटत असल्यामुळे,
ती लोक गट-समाज तयार करत असतात....
त्यातून त्यांना एक उद्देश मिळतो आणि त्याप्रमाणे जीवन शैली तयार होते...
आणि असंच या मुळ विचारांना तडा जाऊन सर्व समाज विस्कटून जातो..
अस हे अथांग आणि अखंड चालणारे, प्रत्येक समाजात सुरु असत..

जर का विचार हेच आपल्या मनाच्या बाहेर आहेत, तर त्यातून निर्माण होणारे पण आपल्या आवकाच्या बाहेर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...