बुधवार, २३ सप्टेंबर, २००९

काही प्रश्न :-

काही प्रश्न :-

१) विचार कसे निर्माण होतात ?

२) खरचं आपण विचार करायला मुक्त असतो का ?

३) विचारांवर विशिष्ट अनुभवांचा पगडा असतो का ?

४) विचार करण्याची क्षमता प्रत्येकाची निराळी असते का ?

उत्तर :-
१) विचार कसे निर्माण होतात ?

निर्माण करणे ही एक प्रक्रिया असल्यामुळे, त्या प्रक्रियेचा मूलाधार निश्चित तत्त्व अथवा विचारच असतात.
मग विचार कुठून उगम पावतात, मनातून असं मानले तर मनावर बराच अनुभवांचा, भावनांचा, प्रसंगांचा, संस्कारांचा, वातावरणाचा, जीवनशैलीचा तसाच विशिष्ट विचार-आचार पद्धतीचा प्रभाव असतो (नसेल ही). यावरून मनच विचारांचा सर्वेसर्वा असतो असे मानले तर, मन याचे उगमस्थान काय ? - परत एक प्रश्न

२) खरचं आपण विचार करायला मुक्त असतो का ?

जर मनच विचारांचा सर्वेसर्वा असतो असे मानले तर, "मन मुक्त असणे" आणि "आपण मुक्त असणे" या योगात खरचं आपण विचार करायला मुक्त असतो, असे मानायला तरी हरकत नसावी.
मग मन आणि आपण मुक्त असणे
- मन मुक्त असणे ही परिपूर्ण Relative Concept (सापेक्ष कल्पना) आहे.
- मनापेक्षा आपण मुक्त असणे म्हणजे जसे विचार येतील तसे, प्रकट तरी करता येतील असे आपण (म्हणजे एकंदरीत संपूर्ण परिस्थिती)असणे कमीत कमी !

३) विचारांवर विशिष्ट अनुभवांचा पगडा असतो का ?

अर्थातच(नाहीपण) !
अनुभवांचा विचारांवर प्रत्यक्ष,
तर मनावर प्रत्यक्ष प्रभाव असतो.

४) विचार करण्याची क्षमता प्रत्येकाची निराळी असते का ?

विचार स्पष्ट प्रकट केले तर निश्चितच समजेल क्षमता !
(हसा ना... शेवटचा प्रश्न [उत्तर ही आहे { आणि ते एवढंच! } ] आहे ... Type करून करून थकलो मी आता)

- एक विचारवंत

२ टिप्पण्या:

  1. आकलनाच्या आवाक्यावर तसेन पूर्वानुभवांवर विचारांचे स्वरूप अवलंबून असते असे मला वाटते.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद आपण आपले विचार प्रकट केल्याबद्दल..

    उत्तर द्याहटवा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...