मंगळवार, ३ नोव्हेंबर, २००९

माती-जल

मातीच्या नात्याशी असलेली आपली पुरातन नाळ आपल्याला या जगातील प्रत्येक उपभोग्य वस्तूंचा भोग घ्यायला लावते.
या नाळेशी सर्व झुगारून संबंध तोडण्यासाठी आपण उपभोगीपण सोडून देतो आणि आकाशाशी नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, कारण आपली स्मृती-संस्कार-विचार-प्रभाव सारे काही मातीस मिळून जाऊन नष्ट होणार असते. मुळात मातीमय मन मिळाल्यावर ते मातीत मिटून जाणारच ना.. मग या स्मृती-संस्काराची ओढ का आपल्याला विमुक्तीसाठी लढ्यायला लावते, निश्चितच नसणार कारण त्यांचा उगमच मुळी या मातीमय मनातून होत असल्याने ते आपल्याला भोगी बनवण्यात प्रोत्साहित करतात.
म्हणजे,

माती-नाळ-मन-स्मृती-संस्कार-उपभोग्य भोग

असा क्रम प्रवाहित होत आपली दशा अति भोगी बनून परत आपण मातीत विलीन होऊन जाणार असतो ...

माती-नाळ-मन-स्मृती-संस्कार-उपभोग्य भोग-अति भोग-माती

तर तो क्रम असा पुढे सरकवला तर तो क्रम न राहता चक्र तयार होईल.

या सर्वात माती सोडून आकाशच बाजूला राहते, ते आपल्याला खुणावते, रक्तात असलेल्या मातीशी विजोड करून मनच आकाश जोड्यायला धावते.. कारण त्याला हे मृद्चक्र दुभांगायचे असते.. मनाला का वाटते असं ?

१) माती ही सगळ्यात जड संकल्पना असे समजले जाते,
२) तर आकाश निर्जड, 'निरकाश', निर्व्याप्त असे मानले जाते.
३) जीवात माती-जल-अग्नी-वायू-आकाश ही सर्व एकाच माळ्येचे मणी जाणले जातात.
४) यांतील माती-जल यांची तर अग्नी-वायू यांची जोडगोळी बनलेली असते.
५) सर्व सजीव-मात्र या पाच अंगांनी परिपूर्ण बनतात.
६) पहिली जोडगोळी सजीव अवतरीत करते,
७) तर दुसरी जोडगोळी सजीव निर्वाणीत करते.
८) जीव अवतरण ते जीव निर्वाण या दोन्हीच्या अल्याड-पल्याड जीवाचे अस्तित्व 'आकाशतत्त्वा'त गृहीत असल्याचे समजले जाते.
९) मनावर अंमळ आकाशाचा असल्याचे मानले जाते ..
१०) I can't write more...

 
     xyz

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...