मंगळवार, २९ डिसेंबर, २००९

पाठांतर पोपटपंची रट्टा अश्या कितीतरी अर्थाने आपण आपली स्मरणशक्ती आजमावीत असतो.
आठवणी अनंत प्रकाराने जमा करत असतो..
ज्या प्रकारे आठवण मनात कोरली जाते, त्याच प्रकारे तिचे स्मरण होत राहते..
एखादे ठिकाण जर डोळ्यांत साठवले असेल तर त्याची स्मृती डोळ्यांसमोर उभी राहते.
एखाद्या व्यक्तीचे स्मरण करत असताना त्याचा आकार, रचना, उच्चार, वास, पद्धत, अनुभव, प्रसंग, नाते, त्याचे घर, परिसर अश्या असंख्य गोष्टी आपल्या मनातून झरझर चटकून जातात.
असंच एखाद्या झाडाचं पण होत, परिसर, आसपासची लोक, सकाळ-दुपार-संध्याकाळची निरनिराळी रूपे, वारयाच्या लहरी-झुळूक, त्याचे आवाज.. बरच..
असाच एखाद्या रस्त्याच..अपघात, पाउस-ऊन यांची रूपे, लगतची दुकाने, दर तासाला बदलणारी वाहतूक, आवाज, सारखी चालणारी कामे- 'काम चालू रस्ता बंद' वगैरे ..वगैरे
एखादा पाण्याचा तलाव,
नदी ..
जंगल...
गाव..
शहर..
राष्ट्र आणि एखादी आपली पृथ्वी..यांच्या स्मरणिका प्रत्येकाच्या मनात उमटतात.
तर मग का नाही आपण या स्मरणशक्तीचा योग्य उपयोग करायला पाहिजे..
या अगणित स्मृतींची सुंदरतेने जपवणूक करण्यासाठी?
की
युद्धात आठवणींचा ठेवा बेचिराख करण्यासाठी?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...