मंगळवार, २६ जानेवारी, २०१०

कारण ..

हेच ते .. का पण??
प्रश्न निव्वळ प्रश्नच का उरतात मागे..
उत्तर अस म्हणून काहीच कस शिल्लक राहत नाही...
एखादी व्यक्ती.. काही व्यक्त करणार का? ... इथून जो प्रश्नोबा सुरु होतो तर..
त्या व्यक्तीला नेमके काय व्यक्त करावयाचे होते?? .. इथवर काही आपली प्रश्नांची साखळी सुटत नाही..
मृत्यू जरी आला समोर... तरी आपल्या समोर प्रश्नचिन्ह उभे राहायचे थांबत नसतीलच बहुतेक..?
फक्त कारणे हे तात्पुरते उत्तरे होऊ शकतात ...नाही..?
पण मग कारणे शोधायला विचार करावा लागत असेल..  ?
आणि जेवढे शुद्ध तार्किक विचार असतील तेवढा कारणांचा तात्पुरता कालावधी वाढत असेल कदाचित..?
विचारांची मालिका, तर्क-वितर्क यांचा काढा आजपावेस्तोर कितीतरी जणांनी कोळून प्याला असेल.. ?
असेच विचार कारणे यांतून कितीतरी पिढ्या खर्ची गेल्या.. पण प्रश्नच मुळी त्यामुळे बाजूला पडला...?
आणि मग आता आता तर प्रश्न पडायला कोणाला वेळ नाही.. आणि उरायला ही वेळ नाही.. कारण ..  अशी असंख्य कारणे उपलब्ध आहेत.. अगदी फुकट ही...???

३ टिप्पण्या:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...