सावली कोण पसरे तर वाटते की तू आहेस
जेव्हा फांदी कुणी हात लावावी अशी बागेत
लाजून सावरून जाई तर वाटते की तू आहेस
रस्त्यातल्या धुक्यात कुठल्या वळणावर दूरवर
एक अशी ज्योत चमकून जाई तर वाटते की तू आहेस
संदल हून दरवळत येणाऱ्या उल्हसित हवेचा
प्रवाह कोण स्पर्शे तर वाटते की तू आहेस
ओढून घेऊन चांदण्यांची लखलखत जाणारी चादर
नदी कोण अवखळून झगमगे तर वाटते की तू आहेस
जेव्हा रात्री कोण उशीर किरण माझ्या बरोबर
चुपचाप हून निजून जाई तर वाटते की तू आहेस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा