आजच काही येणार होते का हे सारे...
हे वारे सळसळणारे.. मनाला समजावणारे ..खरच काही सरेल या वादळात उठणारे असंख्य संभ्रम??
रात्रीची ही तगमग विझणार अशी ... नदीची ?
अवखळणारे प्रहाव नाहीच मानत या झंझावाताला ....दूर अंतरात खळबळ असते..या नर्मदेत!
कापत जातील गिरीकंदर या चक्रीवादळात ..त्यात विंध्य असा तटस्थ!
या मेघदूताला नाही कुणी समजलेले, अविरत....नर्मदा परिक्रमा अर्धवट सोडून विंध्याशी सारीपाट खेळून काशीस जाणारा तो आणि पुढे हिमालयात धर्मराजासारखा.....
कधी तरी समजून घे....हे हिमतुल्य सौंदर्या.... या नर्मदेचे पावित्र्य .. धर्मराजा ही असेल स्वर्गपात्र.. पण तू प्रियेस निरोप पोहचवून परत येऊन परिक्रमा पूर्ण करशील....
म्हणूनच का असेल त्या दोघांची तगमग...नर्मदा आणि विंध्याची ?
हे.. मेघदूत तुला नाहीच समजलेलो आम्ही अजून..
हे.. मेघदूत तुला नाहीच समजलेलो आम्ही अजून..
Too Good!
उत्तर द्याहटवातू हा कशाचा अनुवाद केला आहेस? कि original?
thanks Meenal.
उत्तर द्याहटवाtrying to write something!