गुरुवार, १० मार्च, २०११

तसंच काहीसं...

    मिट्ट उजेडामध्ये
     डोळ्यांनी निजून जावं
      तसंच काहीसं...
     दिसल्या खुणेस साक्ष
    देऊन निघून जावं

   मिणमिणता दिवा नसावा
  मनातला
     तसंच काहीसं...
    झोडपणारा पाऊस नको  
 उरातला

   जादू नजाकतीत ही,
  सही ठरलेली
     तसंच काहीसं...
    कुठे ही पडो मी,
  ही वेळ न ठरलेली

२ टिप्पण्या:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...