शनिवार, ९ एप्रिल, २०११

{In the Brackets}

{गहजब नसता.. कारण कसचा..
वेळेची शिदोरी पुरत नाही इथे.. आणि कामाची पुरचुंडी वाढत चालली आहे.
सतत चिंता ग्रस्त राहायचे मग पुष्कळसा वेळ हातात नाही असे बोंबलायचे..
नाशिकच्या (नाशकाच्या) वेगवेगळ्या पेठेत धुडगूस घालण्यात मजा आहे.. अस असूनही त्यातून बरबादीत जाणारा वेळ परत खायला (खायाला) मिळणार कुठे (कुठ) "?"
नाक्याच्या जागी घे अथवा फाट्यापाशी घे चौकातला सर्कल ओलांड्यालाच (".....लाच") लागणार ..फेमला जाऊ, सिटीला जाऊ पण वेळखाऊ ...
नवीन प्रयोग रहदारीच्या पोलिसापासून (मामाचे रेs..) ते राजकारण्याच्या फडापर्यंत इथेच गुंजणार..गोदेने धरणातून सोडलेल्या पाण्याने (पाण्याच्याने) नवीन धारण केलेल्या रुपासारख..
फडफडीत बदलणारे संस्कार (so called प्रगतीचे वारे) पंचवटीतल्या तरुणातले अथवा कॉलेज रोडच्या टप्प्री छाप गोंडस 'बाळराजांचे' सारखेच..दुवा साधणारा गंगापूर रोड जो आहे..("जो हैं.."च्या चालीत)
विहारची संकल्पना पांडव लेण्यात पोहचते..पण कष्टदायक चांभार लेण्याला शिवत नाही.. टायगर हिल च्या साथीत अंबड मध्ये 'जल'पान होते..टेम्पल हिल ला मग परिवाराबरोबर निसर्गसौंदर्यपान होते..
होणार होणार..असे म्हणत असलेला पूल एकदाचा होणार ...हे वाक्य शिळ होण्याची वाट 'पुलकर्ते' करत असल्याने त्याच्या खडखडीत 'बांध्या'कडे या फाट्यापासून त्या नाकापर्यंत नाके मुरडली जातात..
समयाची (हे आडनाव नव्हे; नाशिकला आढळणा'री' विचित्र आडनावांपैकी) रूपरेखा बांधीत सरकार दरबार बाहेरच्या घडामोडीने 'त्रस्त' होते.. उदा. गाव धुंड जपणारे... भिंतीस भिंत घरे बांधणारे....उंच उच्च तारे नयनात साठवणारे.... स्वर्ण पीठ माजवणारे ..मिजास न दाखवता ऐट (एईत) सांडणारे... मिठाईची लज्जत पारंपारिकेत मांडणारे.. असे बरेचसे भयानक स्तोम आज घडीला कठपुतळ्या हलवतात..मग भांड तर वाजणारच.. ( हे नसेल जमत समजायला तर सोडा...'बी नासिककर')
औद्दौगीकीजनांची लगबग थडथडणारे (थंड थंड एहसास  घेणारे) वारे येता कुठून कुठून.. आणि तुंबून जातात नाशिकच्या सेन्ट्रल जेलप्रमाणे..मग हे गाजरबुजगे घोडे बघतात समोरच्या प्रेस कडे 'हे..'
शेंडीची गाठ जाते कुठे ..त्र्यंबकला हे सांगायला नको.. पण विद्येचा अलंकार (लंकाss..ररेss अंजनेरीलाच रे) होतोय तिकडचा रस्ता आता...भ्रष्ट चौकटीतन..


नाश ला इक (ईख) लावल्यास 
नाहीतर.. इक नाश देखो  च्या धर्तीवर नाशइक होतोय..
एक साशवीच लागलीय नाशिकला.. गोदावरीच्या अथांग प्रवाहासारखच... नाशिक संपन्न होते हे परिपूर्ण इथे...}




[वरील उल्लेखलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे कल्पनाधिस्थित आहे
; सत्यास वाव नसावा व त्या कोणत्याही प्रकारे कसल्याही कारणाकरता वापरू नये, ही नम्र विनंती]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...