शालेय जीवनातले किस्से वरनुरूप शेअरेबल वाटत असले तरी मनातल्या मनात अवीट असतात. कसे लहान प्रसंग तेव्हा मोठे वाटायचे आणि अति महत्त्व देण्यास काहीही कारण पुरायचं. मोठी मोठी स्वप्न पाहण्यात मजा यायची आणि खर म्हणजे आता मोठे होऊनही छोटी किंवा मोठी स्वप्ने पाहण्यात धडकी भरते. तसे शाळेतले दिवस लख्ख आठवणारेच असतात अगदी काळोख्या रात्रीपण. एक-दोनदा जीव नकोसा झाला असेलही तेव्हा पण आता त्यावर हसू येते.. वेळेची करामत बघता येते.. त्यापुढे केलेले कल्पनाविलासाचे सात मजले आणि आता वर्तमानातला फरक केवढा अगडबंब आहे. काही मित्र आता चेहरा समोर आल्यावरही लक्षात येत नाही आणि.., अरे हा मित्र कधीकाळचा आपला खास होता.
यज्ञेय एक मित्र माझा बराच खास आसपास.. त्याची प्रचंड बडबड मला कधी कळायची नाही. मागेल ते द्यायची सवय चांगली होती त्याची पण ती सवय मला कधी आवडली नाही. स्वतःची चिंता वाहण्यातला तो नव्हता. त्या छोट्या दिवसांत त्याने चर्चिले सर्व विषय आता मला एक सुखद ठेवा आहे. शाळेतला असा तसा असलेला पुढे तसा खरा निघाला नाही. शिवाय त्याची बरंच बोलण्याची सवय कामाला आली. फुटकळ नसलेल्या त्या बडबडीला तो शब्द, विषय कुठून आणायचा, निवडायचा माहित नाही. वाचयाचाही यथा-तथा पण चौकसपणा भारी होता. सहलीच्या भानगडी मनात कोरून ठेवायचा..अगदी नकाश्यापासून ते तिथल्या टपर्यापर्यंत. त्याची गोष्ट सांगतो आज..
बिडी सिगरेट दारू या गोष्टींच व्यसन कधीही लागू शकते अर्थात आपला त्यात पुढाकार असला पाहिजे. सांगून सांगून कितीही सांगितले तरी मनाला पटल्याशिवाय आपण ती गोष्ट करू शकत नाही. यज्ञेय ही होता कोवळा आणि व्यसनांची आफत त्यावर आली आणि त्याला निर्णय घ्यावा लागला मनाचा, पुष्कळसा चौकसपणा करून त्याने ठरवले की हा नाद करायचा पण अट एकच की कुणी सोबत पाहिजे.. हे घडलं कसं आणि पुढे काय झालं ते असं..
यज्ञेय राहायचा आपल्या आजी-आजोबांबरोबर, आई-वडील वारले असावेत ..मी कधी याबद्दल त्याला विचारलं नाही. तर तो एकुलता एक नातू असल्याने त्याची खातिरदारी बरीच असायची. त्याच्या घरीही या तिघांशिवाय कुणी राहत नव्हत. गावात होते मामे-मावशी पण त्यांची सलगी नव्हती यज्ञेयशी एवढी. तर या पार्श्वभूमीवर तो बिघडला कुठे..तर असं..
माझ्याबरोबर तो असायचा शाळेत, मैदानावर खेळण्यासाठी आणि कधी आम्ही मित्र त्याच्या घरी असायचो..मोठ घर आणि खेळायला मोकळ रान असायचं. त्यांच्या शेजारी एक मांजर पाळलेली होती आणि ती आमच्यामध्ये लुडबुड करायची. तशी ती खूप लाडकी होती. त्या मांजरीला यज्ञेय बराच रुळलेला होता. तर तिचं ठाण या प्रशस्त घरी जास्त असल्याने ती यज्ञेयच्या मागेमागे फिरायची. तिला खाऊ-पिऊ घालण्यात मजा यायची. अशी होती एकंदरीत यज्ञेयची डीम्ड पेटची भानगड. पुढे तर मला जाणवायला लागलं की हा बडबडपुराण आम्हा मित्रात कमी येतोय आणि घरी राहतोय.. घरी त्याच्या खेळायलाही काही नव्हत, एक त्या मांजरीशिवाय टाईमपास नव्हता. मग आम्ही जायचो त्याच्याकडे तर तो मांजरीला आमच्या जवळ न आणण्याचा आणि तो तिच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करत असायचा. मला हे काही गूढ उकलल नाही, तर मी त्याला विचारलं भाऊ तुला काय झालंय आजकल, बिघडलय काही? तर तो हसून टाळत होता मला.
पुढे पुढे तर त्या दोघांची जोडी ठळक जाणवू लागली. शाळा सोडून तो जिथे जाईल तिथे ती मांजर त्याच्याबरोबर असायची. मी त्याच्या आजी-आजोबांना हे विचारलं तर ते हे ऐकून मला म्हणाले ही गोष्ट आम्हाला तर तुझ्याकडून कळतेय खरचं नवल वाटतंय आम्हाला याबद्दल.. तर असो त्यात काय.. पण मला हे यज्ञेय युग्म सॉलिड खुपत होत.. त्या मांजर मालकाबद्दल मला तर काहीच माहित नव्हत या प्रसंगांपर्यंत.. चार पाच बंगले असणारी कॉलनी होती यज्ञेयची. बाजूच्या नेमक्या कुठल्या घरातून येत असावी ही मांजर मला कधी पत्ता नव्हता. एकदा त्याच्या घरी खेळत असता ती मांजर माझ्या अंगावर आदळली आणि कसला तरी विचित्र वास मला चाटून गेला..तो दारूचा होता हे मला तेव्हा कळलं नाही आणि मीपण तेव्हा होतो चौदा वर्षांचा. मी यज्ञेयला विचारलं की ही कुठून येते..तर तो बोट दाखवून सांगू लागला ..त्या घरातून..ते घर फारसं लांब नव्हत पण दिसत होत एकदम भकास.
त्या बंगल्याची ठेवण पडक्या वाड्यासारखी होती. मांजर काय इतर पाळीव प्राण्यांसाठीच बांधल असावं असं घर. संध्याकाळी घरी जाताना मी हळूच नजर टाकली त्या घरावरच्या पाटीवर..अरे हे तर गावप्रसिध्द दारुड्याच घर होत..शिवाय बाहेर रस्त्यापर्यंत सिगरेटचा वास घुमत होता त्या वेळी. मी पटकन सटकलो.
ती मांजर दारूच्या वासाने भपकलेली होती हे मला कळलं. या प्रसंगांनी माझ डोकं शिणून गेलं. एवढ्याश्या वयात मी जरा जास्त विचार करू लागलो होतो.. तो वास त्या यज्ञेयला गुंगी आणत होता आणि नकळत तो नशेत अडकत होता कोवळ्या वयात.. मन तयार होते त्याचे ग्रहण करायला अश्या गोष्टी आणि सदैव साथ होती मांजरीची त्याला.. अश्या रीतीने कुणी सोबत असल्यावर यज्ञेयचे व्यसनाधीन होण्याचे प्रकार चालू होते.
यावर उपाय काय होता हे समजायला मला वेळ लागला, साहजिकच होते ते..फार काही करावं लागलं नाही आणि मीही काही प्रत्यक्षपणे केल नाही, आपोआप होत गेलं माझ्याही नकळत..
त्या दिवशी मी आणि त्याचे आजोबा काही गोष्टी अडगळीतून काढण्यासाठी गेलो. यज्ञेय मएगी आणायला बाजारात गेला होता आणि सोबत होतीच ती मांजर..घरी त्याची आजी मामाकडे गेली असल्याने आजोबांनीच त्याला मएगी बनवण्यासाठी पिटाळल होत.. त्या मांजराचा विषय माझ्या डोक्यात नुसता घुमत होता. तर मांजराची शत्रुत्व असणारी उंदरं.. त्यांच्यासाठी आम्ही तिथे सापळा सापडत होतो. मी आजोबांना विचारलं की हे काय?.. घरात मांजर येत जात असून हा उंदरांचा पिंजरा का पाहिजे..? मग आजोबा म्हणाले अरे ते मांजर नाहीये तो बोका आSहे.. बोका..!!आणि तो उंदीर पकडण्याखेरीज नुसता हलत डुलत फिरत असतो.. काय उपयोग त्याचा..? तर हा सापळा तरी कामाला येईल..त्या आळशी बोक्यापेक्षा.. मग मी बोललो की मागे मी तुम्हाला सांगितलं यज्ञेय त्या मांजराबरोबर सारखा फिरतोय तर तेव्हा का नाही सांगितलं की तो बोका आहे?, आजोबा न आठवल्यासारखे करत आणि त्या वेळेसारखेच... ही गोष्ट तर तुझ्याकडून कळतेय खरचं नवल वाटतंय... असं बोलले..
माझी अक्षरशः ट्युब पेटली. ती मांजर नाही तो बोका.. अश्या गोष्टी लहानपणी नाहीच कळत लवकर. हे तर काही नाही पुढे तर आणखी गंमत झाली ती अशी..की त्या बोक्याला कुठेतरी दुखापत झाली पायाला आणि तो यज्ञेयच्या घरी पडून राहू लागला.. जसजसे बोक्याचे दिवस लांबले यज्ञेयच्या घरी तसतसे यज्ञेय उठसूट चुळबुळ करू लागला. ही त्याच्या सवयीच्या प्रतीरोधात्मक घटना घडत होती. मी कन्फर्म झालो की हा नक्कीच व्यसनांच्या आहारी गेलाय..
ही तर झलक होती, पुढे अजून काही बाकी होते की ज्याने सर्व बदलून जाऊन आम्ही एका नवीन विश्वात जाणार होतो.. मांजर मांजर जे काही चाललं होत आतापर्यंत ते अचानक कुठून तरी उगवलं आणि बोक्याभाऊचे दिवस पालटले.. तो शिस्तीत त्या मांजरीबरोबर उंदरं खाऊ लागला..आणि का कुणास ठाऊक त्या मांजरासाठी असेल की काय पण त्या बोक्याला दारूद्याकडे जाण्यात इंटरेस्ट वाटला नाही.. जेव्हा जोडी जमली त्या बोक्या मांजरांची तर आपला यज्ञेय भाऊ ही थोडा उदास राहिला काही दिवस बोक्याविना..पण त्याचे दिवसही पालटले आणि तो तारुण्यात आला. बरा सुटला तो यातून.. आणि आता तो विश्वास ठेवायलाही कदाचित नकार देईल की तो नशेत होता आणि मी ते जाणलं होत सर्वांच्या नकळत...
माझी अक्षरशः ट्युब पेटली. ती मांजर नाही तो बोका.. अश्या गोष्टी लहानपणी नाहीच कळत लवकर. हे तर काही नाही पुढे तर आणखी गंमत झाली ती अशी..की त्या बोक्याला कुठेतरी दुखापत झाली पायाला आणि तो यज्ञेयच्या घरी पडून राहू लागला.. जसजसे बोक्याचे दिवस लांबले यज्ञेयच्या घरी तसतसे यज्ञेय उठसूट चुळबुळ करू लागला. ही त्याच्या सवयीच्या प्रतीरोधात्मक घटना घडत होती. मी कन्फर्म झालो की हा नक्कीच व्यसनांच्या आहारी गेलाय..
ही तर झलक होती, पुढे अजून काही बाकी होते की ज्याने सर्व बदलून जाऊन आम्ही एका नवीन विश्वात जाणार होतो.. मांजर मांजर जे काही चाललं होत आतापर्यंत ते अचानक कुठून तरी उगवलं आणि बोक्याभाऊचे दिवस पालटले.. तो शिस्तीत त्या मांजरीबरोबर उंदरं खाऊ लागला..आणि का कुणास ठाऊक त्या मांजरासाठी असेल की काय पण त्या बोक्याला दारूद्याकडे जाण्यात इंटरेस्ट वाटला नाही.. जेव्हा जोडी जमली त्या बोक्या मांजरांची तर आपला यज्ञेय भाऊ ही थोडा उदास राहिला काही दिवस बोक्याविना..पण त्याचे दिवसही पालटले आणि तो तारुण्यात आला. बरा सुटला तो यातून.. आणि आता तो विश्वास ठेवायलाही कदाचित नकार देईल की तो नशेत होता आणि मी ते जाणलं होत सर्वांच्या नकळत...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा