शनिवार, १४ मे, २०११

तू... मी

फसलेलो मी
१ तुझ्यात
२ तुझ्या डोळ्यांत
३ तुझ्या पाहण्याच्या नजरेत
४ तुझ्या नजरेच्या दूरदृष्टीत
५ तुझ्या दूरदृष्टीच्या जगात
...थोडक्यात तुझ्या भविष्यकाळात......... 

मागितले मी
१ तुझे हसणे 
२ तुझे दिवस-रात्र
३ तुझे आयुष्य         
४ तुझे हृदय
५ तुझे सर्वस्व
...थोडक्यात तुला...........

राहिलेलो मी
१ तुझ्याशिवाय
२ तुझ्याकरिता
३ तुझ्याविना
४ तुझ्यासाठी
५ तुझ्यात
...थोडक्यात तू असण्या-नसण्यात............

तुझ्या भविष्यकाळात तुला तू असण्या-नसण्यात मी सापडलो तर...........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...