मार्कंडेय पर्वताच्या माथ्याशी मंदिरात रात्री समई शेजारी एक व्यक्ती पावसाचे रंग ठरवत होती. काल येतानाच तिच्या मनात रंग गलबलत होते.. किती प्रयत्नांनी असे करण्यात तिला आनंद लाभत होता.
निसर्गाचा ठाव मनात गुंजवण्यात ती यथार्थ ठरली होती आणि आता प्रत्यक्षात उतरवण्यात खूप म्हणजे खूपच रंगणार होती ती ..
रेशिमाचा.. मोरपिसांचा.. मृग्नीलाचा.. अश्या कितीतरी रंग साच्यांचा वापर करणार होती..
काय होते ते.. विलक्षणच..
..तर.. दर वर्षी येणारा हंगामातला पाऊस हा कोण्या एका मानवी मनाचा उतार असतो..
कधी खंतवणारी..मोहरणारी..शहारणारी बरसात होते..ती त्यामुळेच..
मागचे साल मला मिळाले होते..खूप सुंदर अनुभव.. धडपडून टाकलेले क्षण पसरले मी माझ्या पाऊस वेळांत..
कड कडाडून झाली ती बरसात मला वाटणार्या मिलनाच्या हुरहूरतेमुळे..
मज नीज आसवांचे ऋण चुकते करावयाचे होते त्या मिळालेल्या पाऊस घडीत.. ठीकेय..फार झाले हे रडगाणे..
अन् आज हा हळुवार बरसणारा पाऊस..खरच ती व्यक्ती फार आनंदी आणि उत्स्फुल्लीत आहे मनापासून या अनुभवाकरता..हे नक्की..
मूर्त थोडे..अमूर्त थोडे ..
उत्तर द्याहटवाथोडेसे मागोवा घेणारे..
अस्पर्श भावनांचे इशारे
खुल्या शब्दातून देणारे ...
भक्ती ...
http://swarnim-sakhi.blogspot.com/
हा ब्लॉग कसा फॉलो करावा :)
मस्तच.. blog पण सुंदर आहे..
उत्तर द्याहटवाधन्यवाद मनापासून..follow option नाहीएय (..
का पण ...
उत्तर द्याहटवाक्षमस्व पण या blog चे लिखाण थोडे आडवाटेचे आहे, following नको त्याकरिता..sorry But thanks..
उत्तर द्याहटवावाचला तर हरकत नाहीये न ..
उत्तर द्याहटवाकाहीसे गूढ गुफेसारखे वाटत जाते ...
अनवट वाट अन तरी अनामिक साद याचा काहीसा मिलाफ...
संवाद चालेल..? प्रश्न ...निदान ...?
निश्चितच.. स्वागत आहे..
उत्तर द्याहटवा