सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११


गाव
गावात विहीर
विहिरीस कथडा
कथडा बाजूने मोडका
बाजूने मोडका रस्ता
मोडक्या रस्त्यात वावटळ
वावटळीत चार स्वर
चार स्वरांचा पाऊस
पाऊस भिजवत कागद
भिजला कागद खिडकीत
खिडकीत मांजर
मांजरास दोन वेळ दुध
दोन वेळ दुधास गवळी
गवळीस तीन गाई
तीन गाई नेई जाईच्या रानात
जाईच्या रानात चार घुंगरुं 
चार घुंगरू पायाला
पायाला मनाची जोड
मनाची जोड सर्वांगाला
सर्वांगाला गारुड नाचता
नाचता चार घुंगरू सांडले जाईच्या रानात
जाईच्या रानात तीन गाई
तीन गाई नेई गवळी
गवळीस दोन वेळ दुध
दोन वेळ दुधास मांजर
मांजर उभे खिडकीत
खिडकीत लिहिला कागद 
कागद भिजला पावसाने
भिजला पाऊस चार स्वरांनी
चार स्वर वावटळीतले 
वावटळ रस्त्याने उडत
रस्ता मोडका बाजूने
मोडका बाजूने कथडा
कथडास विहीर
विहिरीस गाव..
गाव
Related Posts Plugin for WordPress, Blogger...