मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

समरोही

विदेही पाहणे तुझे वारे वाहवून जाई...
वार्‍यास डोलणारे रान
पान दिलेल्या हातात सळसळले..

जस्ताचे शरीर तुझे मर्माने स्पर्शून जाई..
मर्माचे बंधणारे कथन
स्वर ल्यालेल्या कानात कुजबुजले....

रित्तीभर स्वेदनाने कानशील झंकारून जाई....
स्वेद-तळ्याचे गूढ
झरून ओल्या रसनेत सहमसले..

रसातुर नसणे तुझे जीव दाहवून जाई..
दाहास कावणारे जीव
कीव आलेल्या जाईस गुमानले..

स्वर्णीत राहणे तुझे जाईस हेलकावून जाई...
जाईचे गंधित प्राक्तन
टिस-मारल्या या रक्तांग-कळीत साकळले..

1 टिप्पणी:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...