गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

तू अपेक्षा धरतो कोणाकडून?
..जो केवळ क्षण भर भास असणार..या अखिल विश्वाच्या अगणित निरंतर भासमय क्षणांपैकी एक..
आणि त्या भासमय जगतातला तो कुणी एक ही नसणार ..या अखिल विश्वाच्या खिजगणतीत ही निरंतर..

क़रार करून कुठे निभावला गेला..
जवाब मिळून कुणी विचारला गेला..
विराग हा मनीचा कसा निंदवून गेला..
परार्थ मनीचे गुज कवटाळून गेला.. 

तुझ्या डोळ्यातले पाणी कधी ओघळते माझ्या गालावरून
माझे हसणे कधी खुलते तुझ्या चेहऱ्यावरून...
जमली नाही सोबत आपली या वेळेशी
पण अंतरी आहोत आपण एकमेकांपाशी...  

आज यावी आठवण सर्वांची
स्पर्श लपेटलेल्या जीवांची
मग होतील पुष्कळ गोष्टी निखळ मन-संवेदनांची
रुसतील रोखे दु:खांनी कधीचे कढत राहिलेल्यांची

गहिर गर्द वेळ तुला समजून घेण्याची
मर्म बंधित विरही संध्याकाळची
उगाच उसासा रात्रीचा त्यावर
रात्र तर तुझ्या आठवणीत आसमंत दाटवून घेण्याची    

मनात गर्दी अविश्वासाची
भरून आले डोळे मोडलेल्या स्वप्नांनी
रंग नसलेले जीवन
हे उदास दिवस आणि
रात्र जखमी गर्द विरहाची
  
सर अशी अविरत पावसाची
गार थंड मनाची
नको कोसळू असा बेभान 
असू दे मना प्रेमळ उबेची जाण

नसेल रात्र ओली तुझ्या अश्रूंच्या पावसाने
अलगद सावरेल ही निश-किरणे तुझ्या दर्द मनाचे आभाळ-गाणे
तुझ्या स्नेहजनांचा असेल इंद्रधनुष्याचा तीर हृदयात
अशीच मग येवो सुंदर सकाळी रवी-किरणांची साथ..  
 


नजरेत भरताना आज तो सुगंध जाणवत नव्हता
तुला बिलगता तुझ्यातला मी मलाच सोसवत नव्हता



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...