बुधवार, २८ डिसेंबर, २०११

एक संदिग्ध ढग

लाकडाची फरफट जाळून करडा कीर हवेत विरत असतो. त्याचा ढग बनून माझ्या खिडकीशी बोलू लागतो. पारदर्शी वारा नाचवत तो वर वर जात सुटतो आणि ती मालिका अपार प्रेमाने न्याहाळावी तर तिरके पक्षी डोक्यात उडू लागतात. केशरी पर्वताची उतरण पंखांत घेऊन भिरभिरणारे त्रिकोण काळसर छटा पसरवतात. त्यात मी माझे दोन पाणीदार अश्रू भिजवून कोरड्यास अलिप्त करतो. तो जर तर च्या रेषेत खुलासे करत पुढे ढळण्यास मुक्त होतो. वृक्षाचा थंडावा अंतरिक्षात नेण्याचा मानस माझ्यात धगधगत राहतो.. तो तुटून झरझरणारा साद माघार घ्यायला लावतो...
नभाची ची पालवी मावळते आणि मी मला नकोसा होतो.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...