बुधवार, ८ जून, २०१६

Yah Daur

'यह दौर जो के सज़ा भी नहीं जज़ा भी नहीं

यह दौर जो के पुराना नहीं नया भी नहीं'









दौर - फ़ेज - टप्पा - ठेहराव - ट्रान्स - कालखंड - स्थिती

फार काही गल्लत करत नसेल तर, पुण्यात कधीकाळी गाढवाचा नांगर फिरवला गेला होता. तेव्हाचा दौर असा होता कि, पुणे आज इतकेच नावाजलेले होते आणि सत्तादर्शक ठिकाण होते, तिथला नांगर कसाही का असेना तो फिरवणे सूचक अर्थाने सत्ताशकट चालवण्यासारखे समजत असत. जर त्यावेळी नांगर गाढवाला जुंपले गेले, तर मग तिथली सत्ता गाढवाकडून चालवण्यासारखे झाले होते. तेव्हा कुठे स्वराज्याची झळाळी प्राप्त करण्याची आस घेऊन एक पिढी समाजापुढे आली.

नावाजलेले असणे आणि नाव जाणारे असणे या दोन्ही टप्प्यांना एका तराजूत मापले असता, सारखे वजन तोलले जाते तेव्हा कुठे आपण म्हणतो तशी, आपल्या जीवनात, समाज-मनात नशिबाची दारे उघडतात. खरेतर आपणच ती स्थिती समजून घेतो आणि त्या प्रमाणे वागतो. तो नित्य असणारा टप्पा आहे, पण कुणालाच ओळखीचा वाटत नसतो, तो जर जाणला तरच आपले सारे भान हरपते आणि आपल्याला अधिक काही जाणण्यास उरत नाही, केवळ योग्य कृती घडते.



हा टप्पा असा कि क्षमाही नाही प्रायश्चित देखील नाही
हा टप्पा असा कि जुना नाही नवीन देखील नाही

वृक्षांकडे अधिक काही जाणण्यास न राहते का मग, त्यामागे त्यांना सतत दिसणारा हा दौर तर नसेल, त्यांची एकाच स्थळी निरंतर आयुष्य सरेस्तोवर केलेली या दौरचीच अंतर्जल्लोषता-अंतर्मग्नता नाही का जाणवत आपल्याला? आपण ग्रहण करायची का ती मग ?


नाशिकच्या तमाम वृक्षांसाठी त्यांच्या परोपकारी वृत्तीसाठी……

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...