गूढ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गूढ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १५ जानेवारी, २०१२

गूढ रम्य मालिका


घेऊन मनात असंख्य भ्रम मी खास तयार झालो. माझ्याच मनाची तगमग शांत करण्यास आज मी सज्ज झालो.

परिजन डोळ्यात आणून डोह ओलांडत जावे असे काहीसे वाटते. तुटून एकापरी दुसरे जीवन जगावेसे वाटते. दूर

निष्ठांची एक मालिका तरंगत हेलकावणी देत मला तळमळवत असते. दिव्यांचा अंधार-दरीत सजलेला उपसंहार

पलिकडे मला रिझवणार असतो. शांत जागेस अगदी उभ्या सभेने तीन जगांचे, काळांचे, ऋतूंचे मापं छेदत मी

जात असतो. लिहावेसे काही दूर निष्पाप दूनियेचे मला एक अप्रूप असते. घनीभूत होतात शब्द.......

..................तिथली मालिका शिरते गूढ रम्य देशांत....., जिथे मीच आपला नामशेष झालेला असतो.

मायबोली या संकेत स्थळावर वरिल भाग yachwishay या नावाने मी प्रकाशित केला आहे.

बुधवार, २८ डिसेंबर, २०११

एक संदिग्ध ढग

लाकडाची फरफट जाळून करडा कीर हवेत विरत असतो. त्याचा ढग बनून माझ्या खिडकीशी बोलू लागतो. पारदर्शी वारा नाचवत तो वर वर जात सुटतो आणि ती मालिका अपार प्रेमाने न्याहाळावी तर तिरके पक्षी डोक्यात उडू लागतात. केशरी पर्वताची उतरण पंखांत घेऊन भिरभिरणारे त्रिकोण काळसर छटा पसरवतात. त्यात मी माझे दोन पाणीदार अश्रू भिजवून कोरड्यास अलिप्त करतो. तो जर तर च्या रेषेत खुलासे करत पुढे ढळण्यास मुक्त होतो. वृक्षाचा थंडावा अंतरिक्षात नेण्याचा मानस माझ्यात धगधगत राहतो.. तो तुटून झरझरणारा साद माघार घ्यायला लावतो...
नभाची ची पालवी मावळते आणि मी मला नकोसा होतो.
 

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

गूढ

परस्पर जीवांचे स्वप्न अंतर्धान पडू लागते. फेर सहज विशालकाय होऊ लागतो. मनाला पटेल असे गूढ बनू लागते.

कळीची ताटातूट होऊ नये यासाठी चंद्र किरणे पहाटे गलबत झिरपून ठेवतात; सूर्य किरणास अवधी अजून त्या गलबताभोवती पाणी भरण्यास तर इतक्यात कोणी कळीच्या रोख्याने येत जावे आणि न व्हायची ताटातूट व्हावी.

सखीच्या असंख्य प्रश्नांना कृष्ण हे एक उत्तर असावे. तिलाही न पडणारे असंख्य प्रश्न, त्यांनाही कृष्णमात्र उत्तर असावे.

नदीची तगमग न कधी जाणवणारी आपल्याला, जलमय जीवनात तिचे स्वतःचे अश्रू किती वाहत असतात आणि सोबत तिच्या आयुष्याचा भाग असणारे जल त्यात किती मिसळून जात असते याचा अंदाज कोणाला येत असावा.

या कळी, सखी आणि नदी ची साखळी माझ्या मनात डोकावू लागते आणि गूढ सुटता सुटत नाही....
अर्थ मिळता मिळत नाहीच...

Related Posts Plugin for WordPress, Blogger...