नाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ७ जून, २०१६

Nirmal Pran Jeevan - निर्मल प्राण जीवन

"ले चला जान मेरी रूठ के जाना तेरा
ऐसे आने से तो बेहतर था न आना  तेरा"


आज मला कुणास ठाऊक का लिहावंसं वाटतंय अनेक दिवसांनंतर, कित्येक प्रसंग आणि आठवणींसोबत गेलेत हे अनेक दिवस न त्यावर काही लिहिताच.

पुणे शहरात मुक्कामास आल्यापासूनची माझी ही पहिलीच पोस्ट आणि सतत नाशिकगिरी हृदयात ठणकत असतांनासुद्धा दाद न देणारे मन आज लिहिते होतंय, हे विशेष.

ते सारे क्षण-शब्द कवेत घ्यावेसे वाटतायेत,
ज्यांना कधी लिहिते करता आले नाही आणि ना आतापर्यंत त्यांना कुणी वाली होता.

आठवणींचे कढ मनातून ऊतू जाऊ लागलेत आता.

दु:खांच्या डोंगरावर वाहणाऱ्या सुखांच्या वाऱ्याने, आनंदाच्या झऱ्याने उगवत येतायेत आज फुलांचे तुरे. तो डोंगर कायमचाच पण, वाट लागून राहते ती, त्या झुळूकणाऱ्या वाऱ्याची आणि शिंपडणाऱ्या झऱ्याचीच.

बाहेर पायपीट नुसती उपसणारी एक आणि दुसरी आत तगमग न शमणारी, तेव्हा जीव नकोसा होतो; आणि आज एक कुठलंस चित्र पाहिलं आणि 'सकारात्मक' काही चमकलं हृदयात, मग तो विसावणारा नभ आणि हेलावणारा सूर उमगू लागतोच, तेच ठेवून पुढे चालायचंय.

असेच काहीसे दिवस सरले माझे, बाकी काही विशेष नाही.

Miss you नाशिक, या पहिल्या पावसानिमित्तामुळे…. 


गुरुवार, ३१ मे, २०१२

दु:खाश्रित

हुंकाराचा नश्वर साज.. देऊ दे रे मला आज.. निग्रहांकित मनाच्या कोन्यात उतरलेले हसरे पाऊल.. रगीत सुखाची लिप्त पाकळी.. नि:संदेह मागणारा वारा लुटायला लागला तर रात्र सारे देत-देत विसरते, लुटार्‍याकडून मागणे होतेय विरघळून जाते ती पहाट वार्‍यात.... रानदिवा विझला जाईल सर्वस्व समरसून वाहता....

दुरित, ती पापं भोवतात...परिसरात विखरून टाकलेली विषाग्नी जशी, कुठे सलता फिरकणारा पिंगा सोबत करत राहतो..तीच पापं एका चक्रात बांधायला....

केविलवाणा नयकर डोळ्यात उतरत राहतो त्या भर संध्याकाळच्या रंग-मोसमात..त्याचे बापडे सूर गलबलत कंठाशी फिरून जातात.. त्याची मोहमयी दार्शनिक अवस्था फक्त सर्वात लपेटून जाते....... हृद्य असे काही निसटू लागते..,

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१२

उगवते तेज

मला माझे रुदन सापडत नव्हते..
काल सकाळी उगवत्या तेजात सामावलेले मला माझे रुदन..कळले ते कोठे आहे...

...मावळतीची वेळ आणि मी त्यास अर्था-अर्थी दूर लोटतो..


तरीच हे उसन्या कालचक्रात गोठलेले जीवन.. ते ढकलण्यास उसना उत्साह..
त्या उत्साहात उत्सवही येतो उसनाच....

गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

फुलपाखरू

घेरणारे वादळ .........
त्याला छेदणारे पावसाचे थेंब
आणि मी भांबावलेल्या आठवांनी तुझ्याशिवाय..
तसं....; फुलपाखरू मला येऊन समजावते दु:ख तुला कशाचे
मी अबोल मातीकडे पाहतोय.. भिरकावून घेतोय कोणाकडून..
छाती थरथरते माझी फुलपाखराच्या निघण्याने
परका नसलो तर सांगितले असते क्षणभरात मी
उडी घेऊन निजलो होतो त्या पाण्यातच....
फिरून आलो त्यासमच उद्वेगाने..तुला भेटायला परिपूर्ण बुद्धिरूपाने
बस... ते फुलपाखरू शरीर मजला नाही आता.............. 

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

खुलवणारी....

खुलवणारी रात्र होती पण ती खुललेली नव्हती.
तिचा नाट्यमय राग दूर कुठे निघून गेला होता.
उदास तिच्या नजरेत भारलेला भूतकाळ व्यापला होता.
मागमूस नसलेला चिरकाळ छळत राहिला होताच पण प्राणाहून प्रिय तो आज छळ मांडणारा झालाय हे नकोसेच होतंय तिला....

तलमी झंकाराने मोहरणारा तिचा तो आज अतृप्त अतृप्त वागत होता. नाद सभोवताल छेदत तिला कवळून घेत होता. टोचणारे भस्म लावल्यासारखे ती तळमळून उठत राही आज......

तिच्या मागच्या जन्मी माणसाने रिक्त जगी भावनांची उजळणी झाली होती. ती रिक्तता या जन्मी मोकळी करण्यास मनोमन थिरकणारी तिची माणसी चर्या आज उद्वेगाने उजळून उठत राहतेय.....
चाप भाकितांचा रुतणार कि नाही प्रत्यक्षी...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...