विखरून विस्तारून समजवणारा वारा कधी दिसत का नाही?
प्रकटून धगधगुन चेतवणारा अग्नी कधी स्पर्शता का येत नाही?
ओंजारून लपेटून जगवणारा जल कायमस्वरूपी तृप्त का होत नाही?
खुलून जवळून उपभोगवणारा आकाश मोकळ सहज समजत का नाही?
बहरून गहरून सजवणारी आपली पृथ्वी कशी आपल्याहून विलग होत नाही?
...
..
मस्तवालपण
ज्वलंतपण
संजीवकपण
स्वतंत्रपण
अविनाशीपण
हा पण च कारणीभूत या सर्वांना!
मंदिरातील ज्योत या 'पण' चा अपूर्व संगम घडवते....
'तन्मयता' हाच तो ज्योतीत दडलेला ...संगम
आपल्यात नसलेला तो गुण खचितच आपण मंदिरातून उचलतो...
आणि त्या मंदिरात ... आपण 'तन्मय' होतो..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा