गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

रंजिश ही सही...

रंजिश ही सही...या गझलेतील ओळ आहे ...
"पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो..
रसमो-रहे दुनिया ही निभाने के लिये आ.."
  मेहदी हसन अतिशय सुबक पेश करतो..यातील रसम चा अर्थ आहे सोपस्कार..
जगभरातील अलिखित नियमांकरता 
आणि आपल्यात कधीही न बांधले गेलेले नाते या..गोष्टींकरता तरी ये...
चुणूक भर नजर जुळल्यावर मनात झंकारणारे सरगम.. यात कसले आले नाते-संबध.
पण जगरहाटीचे चार संदर्भ माहित असतील ..तर तू नक्की येशील.

blog विश्वात असच संचारणारा मी ... मनातील सरगम सुरात पेश करण्याचा प्रयत्न करतोय..
मरासिम बांधण्याचा.. प्रयत्न.
या एक वर्षात दिसलेली क्षणिक-चुणूक अशी भेट मला खूप भावली..त्याकरता सर्वांचे आभार..    

४ टिप्पण्या:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...