मंगळवार, २६ एप्रिल, २०११

गच्च आठवणी न आठवणारी..

झर एक आठवण तुझी..
दर दिवशी..भर दुपारी.. सुस्तावते खरचं, पण एक खर की.. त्या नंतर ची संध्याकाळ वसूल करते 
तो आठवणीतला क्षण..

"तुझ्याखातर तुझे नाव नाही घेत होते..
तुझ्याखातर तुझे नाव नाही घेत होते..
पण गप्प ची गोष्ट ,
खुप अपमानित झाली.... "

संदर्भ - जब ए जाने हज़ी वक्त पे आलम हुई..-आशा भोसले

हे दुपार-संध्याकाळ मधले संभाषण माझ्या मनात गुंजत असत..रोज
मी तसा साक्षीत असतोही.. नसतो ही...दररोज

तुझ्या जाणण्यात मी हरवलो आहे.. तुझ्या विस्मरणात मी सापडलो आहे..
पडदा पडणार आहे तुझा त्या गोष्टींवर.. की ज्या गोष्टी तुझ्या, मी पडद्यात लपवल्या आहे.. 

"पडद्यास मुखवटा रहित व्हायचे होते
 हो मलाच.. मलाच खराब व्हायचे होते

खेळलो बालपणात लपाछपी खूप
आले तारुण्य तर वाटे हिस्से व्हायचे होते

सोबत राहतो रात्र-दिन सम
तू आहे सूर्य मला तर चंद्र व्हायचे होते

माझ्या डोळ्यांचा काही दोष नाही
तारुण्य तर अप्रतिम तर व्हायचे होते

होत्या नशिबात आपल्या भेटी गाठी 
पण न.. आपल्यास कुठे यशवान व्हायचे होते"
संदर्भ- हिज़ाब को बेनक़ाब होना था..- नुसरत फ़तेह अली खान

हा प्रयत्न नव्हता तू असल्याचा.. नसल्याचा..
असेलच तू माझ्यात..अन नसेल ही.. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...