शुक्रवार, २९ एप्रिल, २०११

तुझा होकार.

वृक्षवेलींच्या दाट छायेत, 
सूर्य किरणांच्या जाळीदार कवडसातून, 
तलावातल्या पाण्यात उभे झगमगणारे नर्मजीवी कमळ; डोळ्यांच्या कड्यांवर पूर्ण सामावलेले..

समोर केवळ तू असून ही हे सामावलेले चित्र ... 
या क्षण चित्राचा काठोकाठ अनुभावाकरता तुझा आभासी नसलेला अगदी खराखुरा निश्चयी निर्णय.......

त्या पाठोपाठ माझा एक हुंकार मला डिवचायला लागला... या संपूर्ण चित्रात अडगळी सारखा तो प्रतिसाद मलाच जीवघेणा वाटला.. भराभर काट छाट करून टाकणारा प्रलय त्या निसर्ग रम्य क्षणाला जडला आणि त्या डोळ्यांच्या कड्यांवर काठोकाठ पाणी तरळू लागले..

तुझ्यासाठी अगम्य असलेल्या या माझ्यातल्या हालचाली, तुझा तो कातर चेहरा सांगत होता..ही एक वेळ मी तुझ्यासाठी अथवा तू हरवणार मला नेहमीसाठी.. अगदी खर..    

आणि माझा तो हुंकार तुला ऐकू गेलाच नाही.. हे तुझ्या पुढच्या प्रश्नावरून आलं लक्षात..मग तो आला डोळ्यात उर भरून...पाण्याचा पूर घेऊन.. बरसला पाउस भरपूर मनात..अन मी तुला कायमच हरवलं.. 

हा वेळ ही नाही राहत टिकून
याचा स्वभाव ही माणसा सारखाच...

वक़्त रहता नहीं कही टिककर
इसकी आदत भी आदमी सी है

-गुलजार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...