रविवार, २९ मे, २०११

होताहोता

जाहल्या हितभर वाटेन-वाटे मनातल्या भावनांच्या.. पडल्या जाणिवांच्या खुणा हृदयाच्या कोपरां-कोपरांत
विचित्र चकमक दिवसभर.. निषिद्ध कलकल रात्रभर..
न हे तुझे दु:ख न ही परिणती कोण्या सुखभर प्रसंगांची., जे दु:खाचे कारण..
कण हे परस्पर मरणाचे आणि अंतहीन विषादाचे शिवशिवतायेत इथे.. स्वप्नभर जगून विरहाचा वणवा पेटवतायेत इथे..

हिस्से झालेल्या भावना जगू न देता कायम मरण्यास ही दुर्लक्षित करतात.
हित विरहित नसलेले हिस्से गोल गोल फिरून जाणीवा धडकवतात गोल हृदयाच्या गाभारात..
गरगर खुपसणारे कुठवर रुतणार त्या लाल गोळ्याला..थडका श्वासांचा सावरतो ठीबकण्यापासून तो लाल गोळा..

कोणास बोलावत होता तो बुडणारा दिवस
आवाज तर आला होता पण कुणी पासंग नव्हता
रात्रभर वेदनेची ज्योत जळत राहे
दु:खाची लव थरथरत राहे रात्रभर..
किसे पुकार रहा था वो डूबता हुआ दिन
 सदा तो आयी थी लेकिन कोई दुहाई न थी

 नसीर
रातभर दर्द की शम्मा जलती रहे
गम की लव थरथराती रहे रातभर..
आपकी याद आती रही..
आपली गाठ सुटण्याकरिता बांधली भराभर..जसा काजवा चमकावा क्षणभर.. 
विलसत होती खूपशी फांदी-फांदीतून पालवी एके दिवशी सळसळ पदभ्रष्ट होण्यासाठी..
लयाचा सुटणार होता बंध संगीतातून आपल्या काही तालदार रचनेपासून..
होता नव्हता सुखनैव प्रसंगाचा भडीमार आपल्या या जालीकेतल्या जगण्यात, केला नाही हिशोब त्या सुखांचा परतून येणाऱ्या दु:खांसाठी.. न हुरळलो सुखास त्या आधी जगलेल्या दु:खभर क्षणांसाठी

कर अवहेलना आयुष्या पुरेपूर .. 
झरणारा वळवाचा पाऊस शोषून न घेता चार महिने विरक्त भटकणारा मान्सूनचा पाऊस हवा धरतीला .. 
मी मला वळवाचा पाऊस राहू दे.. शिणलेले थेंब मिरवत फडकावत बरसेल अन तरसेल हे जीवन माझे इथे.. 
स्वप्नाची हवा राहू दे जीवनात केवळ तो निर्व्याज श्वास घेण्यास मिलनाचा ..
ती पेटेल वणवा शुष्क ठाक झालेल्या या जीवनाच्या जंगलात वियोगाची..केवळ विरहाची.. 
स्वप्नील हवा झुरझुर वारा होईल मग अद्वातद्वा प्रलायाग्नी उभा करायला या जंगलात इथे .. 
होताहोता थांबेल..संपेल हे जीवन माझे श्वास अन पुढचा नसलेला श्वासाच्या अंतरात..
तो एक ठोका चुकलेला असेल..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...