रविवार, ७ ऑगस्ट, २०११

तू


माझ्या दृष्टीकोनातून जग किंवा तू
किंवा तुझ्या दृष्टीकोनातून तू
त्यापेक्षा श्रावणावर लिही 
रिमझिम पाऊस पडतो आहे
आणि सगळीकडे हिरवेगार झालेय 
मस्त होईल

मन आकाश निळे
मन चांदण्यांचे तळे
रात्रीच्या अंधारात जळे
मन माझे...

माझं मलाच कळत  नाही
कुठे आणि का चाललो आहे मी
वाटतंय मी खूपच बाळबोध, बालिश आहे
फक्त शब्दांचे क्षणभर टिकणारे बुडबुडे तयार करतो

काठावरून चालत मी बराच लांबचा पल्ला गाठलाय
पण पाण्यात कधी उतरलोच नाही
अन पायाखालची वाळू सरकायची भीती...

कधी तरी सगळ्या भावना एका गाठोड्यात बांधाव्यात
आणि दगड बांधून पाण्यात ढकलून द्याव्यात
मग मला देखील तुझ्या सारखं निर्मळ होता येईल
खरच होता येईल....?

डोळ्यात तुझ्या मी पाहिले
दु:ख शापितांचे
निर्मळ मनावरले
व्रण शोषितांचे

मी येऊ का?

तुझ्याबरोबर... तुझ्याच वाटे  वरून ....
..
...
...

५ टिप्पण्या:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...