मंगळवार, ७ जून, २०१६

Nirmal Pran Jeevan - निर्मल प्राण जीवन

"ले चला जान मेरी रूठ के जाना तेरा
ऐसे आने से तो बेहतर था न आना  तेरा"


आज मला कुणास ठाऊक का लिहावंसं वाटतंय अनेक दिवसांनंतर, कित्येक प्रसंग आणि आठवणींसोबत गेलेत हे अनेक दिवस न त्यावर काही लिहिताच.

पुणे शहरात मुक्कामास आल्यापासूनची माझी ही पहिलीच पोस्ट आणि सतत नाशिकगिरी हृदयात ठणकत असतांनासुद्धा दाद न देणारे मन आज लिहिते होतंय, हे विशेष.

ते सारे क्षण-शब्द कवेत घ्यावेसे वाटतायेत,
ज्यांना कधी लिहिते करता आले नाही आणि ना आतापर्यंत त्यांना कुणी वाली होता.

आठवणींचे कढ मनातून ऊतू जाऊ लागलेत आता.

दु:खांच्या डोंगरावर वाहणाऱ्या सुखांच्या वाऱ्याने, आनंदाच्या झऱ्याने उगवत येतायेत आज फुलांचे तुरे. तो डोंगर कायमचाच पण, वाट लागून राहते ती, त्या झुळूकणाऱ्या वाऱ्याची आणि शिंपडणाऱ्या झऱ्याचीच.

बाहेर पायपीट नुसती उपसणारी एक आणि दुसरी आत तगमग न शमणारी, तेव्हा जीव नकोसा होतो; आणि आज एक कुठलंस चित्र पाहिलं आणि 'सकारात्मक' काही चमकलं हृदयात, मग तो विसावणारा नभ आणि हेलावणारा सूर उमगू लागतोच, तेच ठेवून पुढे चालायचंय.

असेच काहीसे दिवस सरले माझे, बाकी काही विशेष नाही.

Miss you नाशिक, या पहिल्या पावसानिमित्तामुळे…. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...